शहरं
Join us  
Trending Stories
1
तामिळनाडूचे CM होताच जोसेफ विजय यांनी काढला १० लाख कोटींच्या कर्जाचा मुद्दा, स्टालीन भडकले! प्रकरण काय?
2
Persian Gulf Tension: समुद्रात पुन्हा रक्ताची होळी? कतारच्या किनाऱ्याजवळ ब्रिटनच्या जहाजावर क्षेपणास्त्र हल्ला
3
Thalapathy Vijay : मोफत वीज, महिला सुरक्षा... मुख्यमंत्री होताच थलापती विजय यांचा 'मास्टरस्ट्रोक', घेतले मोठे निर्णय
4
Hanta Virus : "घाबरण्याची गरज नाही, परिस्थिती नियंत्रणात, पण..."; हंटा व्हायरसबाबत WHO चा मोलाचा सल्ला
5
बूट पळवण्याच्या खेळावरून इतका वाद झाला की, चिडलेल्या नवरीनं मांडवातूनच नवऱ्याला माघारी धाडला!
6
भोंदू खरात प्रकरणी रूपाली चाकणकर यांची चौकशी सुरू; नाशिकमध्ये SIT समोर नोंदवला जबाब
7
ऑस्ट्रेलियन क्रिकेटची पाकिस्तानसारखी अवस्था, करारावरून वाद, खेळाडू आणि बोर्ड आमने-सामने, ५ क्रिकेटपटूंनी घेतला असा निर्णय
8
परदेशातून भारतात आले ११.४ लाख कोटी रुपये, जगातील सर्वाधिक 'रेमिटन्स' मिळवणारा देश
9
ड्रायव्हर, नोकर अन् नातेवाईकांच्या नावे जमवलेली संपत्ती होणार जप्त; सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय
10
"आई-वडिलांना सोड तरच..."; हमाली करुन बायकोला शिकवलं, नोकरी मिळताच नवऱ्याला धमकी
11
फोटोवर थुंकला, मग हर की पैडीमध्ये जिवंत पत्नीचं केलं पिंडदान, व्हिडीओ व्हायरल होताच खळबळ
12
मातृत्वाचे ममत्व अन् सर्वोच्च त्याग ; ‘ती’च्या किडनीदानाने ३७ मुलांना जीवनदान
13
कोकण, गोवा प्रवाशांना रेल्वेचा सुखद दिलासा; साप्ताहिक उन्हाळी विशेष रेल्वे, जाणून घ्या संपूर्ण माहिती 
14
तिन्ही बापलेक विहिरीत उतरले अन अचानक विहीर ढासळली; मातीच्या ढिगाऱ्याखाली दबून अंत
15
संसार वाऱ्यावर सोडून चार मुलांची आई शेजाऱ्यासोबत फरार! हतबल पतीने उचललं टोकाचं पाऊल
16
खळबळजनक दावा! " भोंदू खरात प्रकरणात ४ मंत्र्यांचा समावेश, लवकरच मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवणार"
17
सोमनाथ : अखंड श्रद्धापर्व अन् महाराष्ट्राशी जडलेले अभेद्य नाते
18
Elvish Yadav : "२ दिवसांत १० कोटी दे, नाहीतर गोळ्या घालू...", एल्विश यादवला जीवे मारण्याची धमकी
19
Video - भक्ती, दातृत्वाचा संगम! भाविकांना प्रसादात मिळतात चक्क पैसे; मंदिरातील अनोखी परंपरा
20
इराणसोबतच्या 'पीस डील'साठी अमेरिकेची मोठी पावलं! मार्को रुबियो अन् कतारच्या पंतप्रधानांमध्ये खलबतं
Daily Top 2Weekly Top 5

आदिवासींच्या प्रश्नांवर परिषदेत चर्चा

By admin | Updated: June 17, 2014 00:39 IST

हिंगोली : सेनगाव तालुक्यातील वाघजाळी येथे १३ जून रोजी अखिल भारतीय आदिवासी महासभेच्या वतीने आदिवासी अधिकार परिषद घेण्यात आली.

हिंगोली : सेनगाव तालुक्यातील वाघजाळी येथे १३ जून रोजी अखिल भारतीय आदिवासी महासभेच्या वतीने आदिवासी अधिकार परिषद घेण्यात आली. या परिषदेत मान्यवर मंडळींनी मार्गदर्शन केले.
या परिषदेचे उद्घाटन भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे राज्यसरचिटणीस कॉ. प्रा. नामदेव कन्नाके (चंद्रपूर) यांच्या हस्ते करण्यात आले. अध्यक्षस्थानी सीताराम भोपे होते. यावेळी भाकपचे राज्य समुपदेशक कॉ. राजन क्षीरसागर (परभणी), भाकपचे हिंगोली जिल्हा सचिव आर.आर. कोर्डे, कॉ. किशनराव काशिदे, एम. एस. ई. बी. वर्कर्स फेडरेशनचे टी. के. टापरे, कॉ. पदमाकर लांडगे, हफीजखाँ पठाण यांची प्रमुख उपस्थिती होती.
देशभरातील आदिवासी समाजासमोरील समस्या, त्यांचे जीवनमान, सरकारच्या आदिवासी विरोधी धोरणाचा आदिवासींच्या जीवनावर होणारा परिणाम या अनुषंगाने परिषदेत चर्चा झाली. यामध्ये जमीन सुधारणा व जमीन वाटपाचा प्रश्न, वन अधिकार कायद्याची अमलबजावणी, जमीन संपादन व विस्थापनाचा प्रश्न, आदिवासी जमीनीचे होत असलेले हस्तांतरण, आदिवासी शेतकऱ्यांसाठी खास योजनांची मागणी, आदिवासी क्षेत्रात रोजगार हमी योजना कायद्याची अंमलबजावणी, किरकोळ वन उत्पादनासाठी किमान समर्थन किंमती, आदिवासी कामगारांचे शोषण, आदिवासी तरुणांचा प्रश्न, सार्वजनिक सेवांमधील आरक्षणाचा प्रश्न, आदिवासी भागातील विकास व निधी देण्यातील सरकारचा भेदभाव, आरोग्य- शिक्षण, चुकीच्या अन्नधोरणाविरुद्ध लढा, घटनात्मक आणि राजकीय हक्कांचा प्रश्न, सामाजिक सुधारणा व आदिवासी स्त्रीयांचे अधिकार या देशव्यापी प्रश्नांवरही चर्चा करण्यात आली. तसेच जिल्ह्यात वन कायद्याची अंमलबजावणी, गायरान जमीनीचे पट्टे नावाने करण्याची मागणी, रोजगार हमीची अंमलबजावणी, घरकुलाचा काळाबाजार, दारिद्र्यरेषेखालील लाभार्थी यादीचा घोळ, रेशन व रॉकेलचा काळाबाजार, पिण्याचे पाणी, शिक्षण, सामाजिक अत्याचार, स्त्रीयांचे प्रश्न सोडविण्याबाबत परिषदेमध्ये विचारवंतन करण्यात आले. येत्या काळात आदिवासी गावांच्या प्रश्नांवर राज्यपालांना भेटून निवेदन देण्याचे ठरविण्यात आले. तसेच ९ आॅगस्ट रोजी आंतरराष्ट्रीय आदिवासी दिनी कळमनुरी येथे आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयावर मोर्चा काढण्याचा निर्णय घेण्यात आला. (प्रतिनिधी)
९ आॅगस्टला आंदोलन
आदिवासी समाजासमोरील समस्या, त्यांचे जीवनमान, सरकारच्या धोरणाचा आदिवासींच्या जीवनावर होणारा परिणाम या अनुषंगाने परिषदेत चर्चा झाली.
आगामी काळात आदिवासी गावांच्या प्रश्नांवर राज्यपालांना भेटून निवेदन देण्याचे या परिषदेत ठरविण्यात आले.