गंगापुरात अतिक्रमण हटविताना भेदभाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2020 04:25 IST2020-12-17T04:25:53+5:302020-12-17T04:25:53+5:30

गंगापूर शहरात सध्या सर्वच रस्त्यांचे रुंदीकरण व मजबुतीकरणाचे काम सुरू आहे. या रस्ता कामात अनेकांची दुकाने हटविली जाणार असल्याने ...

Discrimination while removing encroachments in Gangapur | गंगापुरात अतिक्रमण हटविताना भेदभाव

गंगापुरात अतिक्रमण हटविताना भेदभाव

गंगापूर शहरात सध्या सर्वच रस्त्यांचे रुंदीकरण व मजबुतीकरणाचे काम सुरू आहे. या रस्ता कामात अनेकांची दुकाने हटविली जाणार असल्याने व्यवसायाला खीळ बसणार आहे. वैजापूर मार्गावरील न्यायालयासमोर मोकळी जागा असल्याने अनेकांनी बांबू, बल्ल्या लावून या ठिकाणी जागा पकडल्या आहेत. सदर बाब नगरपालिका प्रशासनाच्या लक्षात आल्यावर त्यांनी सर्व बांबू व बल्ल्या जप्त केल्या म्हणून सर्व तरुणांनी आपले साहित्य परत घेण्यासाठी अधिकाऱ्यांना घेराव घातला होता. याप्रकरणी मुख्याधिकारी यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी काही लोकांशी संगनमत करून संपूर्ण गावातील किंवा न्यायालयाच्या भिंतीस लागून असलेले इतर कोणतेही अतिक्रमण न काढता केवळ वैजापूर मार्गावरील न्यायालयाच्या उत्तर बाजूस भिंतीलगत अतिक्रमण काढले आहे. सदरची कृती भेदभावपूर्ण व दूषित हेतूने केल्याचे म्हटले आहे. या निवेदनावर ३० तरुणांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

Web Title: Discrimination while removing encroachments in Gangapur