पाच जणांवर हद्दपारीची कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2017 00:29 IST2017-08-25T00:29:31+5:302017-08-25T00:29:31+5:30

आगामी गणेशोत्सव, बकरी ईद तसेच नांदेड महापालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने जिल्ह्यातील पाच गुन्हेगार प्रवृत्तीच्या इसमांना हद्दपार करण्यात आले आहे. यात धर्माबाद तालुक्याचे ३, अर्धापूर १ आणि नवीन नांदेडातील एकाचा समावेश आहे.

 Disciplinary action against five people | पाच जणांवर हद्दपारीची कारवाई

पाच जणांवर हद्दपारीची कारवाई

लोकमत न्यूज नेटवर्क
नांदेड : आगामी गणेशोत्सव, बकरी ईद तसेच नांदेड महापालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने जिल्ह्यातील पाच गुन्हेगार प्रवृत्तीच्या इसमांना हद्दपार करण्यात आले आहे. यात धर्माबाद तालुक्याचे ३, अर्धापूर १ आणि नवीन नांदेडातील एकाचा समावेश आहे.
शहर व जिल्ह्यातील आगामी सण, उत्सव कालावधीत शांतता व सुव्यवस्था टिकवून राहावी यासाठी पोलिस दलाच्यावतीने विविध उपाययोजना केल्या जात आहे. प्रतिबंधात्मक कारवाई करुन गुन्हेगारीला आळा घालण्यात येत आहे.
जिल्ह्यात मारहाण करणाºया, जबरी चोºया करणारे, खंडणी गोळा करणारे तसेच बळाचा वापर करुन हिंसाचार करणाºया पाच जणांच्या हद्दीपारीचे आदेश दिले आहेत.
त्यात नांदेड ग्रामीण ठाणे हद्दीतील राहूलनगर सिडको येथील बाबुसिंह दशरथसिंह रघुवंशी (वय ३८), अर्धापूर ठाणे हद्दीतील बारसगाव येथील नरहरी सजनाजी बारसे (वय ६१) धर्माबाद ठाणे हद्दीतील येवती येथील साहेबराव गंगाधर अंबेकर (वय ३७), यादव गंगाधर अंबेकर (वय ३२) आणि यल्लापूर येथील धोंडीबा लालबा गायकवाड (वय ४५) या पाच जणांना हद्दपार करण्यात आले आहे.

Web Title:  Disciplinary action against five people