शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

जायकवाडीतून विसर्ग चार टप्प्यांत कमी; आवक १४,२५६ क्युसेक, विसर्ग २८,९९६ क्युसेक

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 30, 2025 19:40 IST

आवक घटल्याने शुक्रवारी दुपारी दोन वाजेनंतर चार वेळेस विसर्ग हळूहळू कमी करण्यात आला.

पैठण : जायकवाडीत आवक वाढल्याने गुरुवारी रात्री ९ वाजेनंतर धरणाच्या दरवाजांची उंची चार फुटांपर्यंत वाढवून गोदावरी पात्रात ७५ हजार ४५६ क्युसेक विसर्ग करण्यात आला होता. मात्र, आवक घटल्याने शुक्रवारी दुपारी दोन वाजेनंतर चार वेळेस विसर्ग हळूहळू कमी करण्यात आला. सायंकाळी सहा वाजता केवळ २८ हजार ९९६ क्युसेक विसर्ग सुरू होता, अशी माहिती शाखा अभियंता मंगेश शेलार यांनी दिली.

जायकवाडीतून गोदावरी पात्रात आठ दिवसांपासून विसर्ग सुरू होता. आवक वाढल्याने गुरुवारी आधी १८ दरवाजे तीन फूट उघडून ५६ हजार ५९२ क्युसेक विसर्ग करण्यात आला. पण, आवक वाढल्याने रात्री नऊ वाजता दरवाजांची चार फुटांपर्यंत वाढवून ७५ हजार ४५६ क्युसेक विसर्ग केला होता. शुक्रवारी दोन वाजेपर्यंत हा विसर्ग सुरू होता. मात्र, उर्ध्व धरणांतून होणारी आवक घटल्याने दोन वाजेनंतर चारवेळेस हळूहळू विसर्ग कमी करण्यात आला. सध्या जायकवाडीतून २८ हजार ९९६ क्युसेक विसर्ग सुरू आहे. तर, धरणात १४ हजार २५६ क्युसेकने आवक होत आहे.

सिद्धेश्वर मंदिरात पाणी७५ हजार विसर्गामुळे शुक्रवारी पैठण येथील संत एकनाथ महाराज मंदिर परिसरातील घाटांच्या पायऱ्यालगत पाणी आले होते. हे पाणी बघण्यासाठी मोठी गर्दी नागरिकांनी केली होती. तसेच गोदावरीच्या शेजारीच असलेले सिद्धेश्वर महादेव मंदिर पाण्याने पूर्ण भरले होते. त्यामुळे दोन दिवसांपासून भाविकांना महादेवाचे दर्शन घेता आलेले नाही.

टॅग्स :Jayakwadi Damजायकवाडी धरणRainपाऊसWaterपाणी