आपत्ती कक्ष बनले दक्ष !
By Admin | Updated: August 3, 2014 01:15 IST2014-08-03T00:16:18+5:302014-08-03T01:15:57+5:30
लातूर : पुणे जिल्ह्यातील माळीण येथे घडलेल्या दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी ‘लोकमत’ने लातूरचे आपत्ती व्यवस्थापन किती दक्ष आहे,

आपत्ती कक्ष बनले दक्ष !
तीन शिफ्टमध्ये ड्युटी... ४आणीबाणीच्या प्रसंगी मदत लवकर मिळावी, यासाठी आपत्कालीन कक्षात तीन शिफ्टमध्ये ड्युटी लावण्यात आली आहे. सकाळी १० ते सायंकाळी ५.४५ पर्यंत आॅपरेटरची ड्युटी आहे. त्यानंतर रात्री १० वाजेपर्यंत अन्य कर्मचारी नियुक्त असेल. रात्री १० ते सकाळी ७ वाजेपर्यंत तिसरा कर्मचारी कार्यरत असणार आहे. नियुक्ती दिलेला कर्मचारी गैरहजर राहिल्यास त्यावर सेवाशर्ती नियमानुसार कार्यवाही करण्यात येईल, असे निवासी उपजिल्हाधिकारी विश्वंभर गावंडे यांनी सांगितले. लोकमत इफेक्ट : स्टिंगनंतर प्रशासनाला जाग
लातूर : पुणे जिल्ह्यातील माळीण येथे घडलेल्या दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी ‘लोकमत’ने लातूरचे आपत्ती व्यवस्थापन किती दक्ष आहे, याचा स्टिंगद्वारे भंडाफोड केला होता. हे वृत्त शनिवारी झळकताच जिल्हा प्रशासन खडबडून जागे झाले. तात्काळ आपत्ती निवारण कक्ष कार्यान्वित करून २४ तास कर्मचारी दक्ष राहील, अशी कार्यवाही प्रशासनाने केली आहे. लातूरच्या जिल्हाधिकारी कार्यालयात आपत्ती निवारणासाठी आपत्कालीन कक्षाची स्थापना करण्यात आली आहे. याशिवाय, तालुक्याच्या ठिकाणीही समित्या नेमण्यात आल्या आहेत. जिल्ह्यातील कोणत्याही भागात आपत्ती ओढवल्यास आपत्कालीन कक्षातून अग्निशमन, पोलिस, महसूल, आरोग्य अशा महत्वपूर्ण विभागांशी समन्वय साधून घटनास्थळी संकटग्रस्तांना तात्काळ मदत मिळावी, यासाठी प्रयत्न केले जातात. संपूर्ण वर्षभर अन् २४ तास हा कक्ष कार्यान्वित ठेवण्याची सूचना आहे. परंतु, माळीण येथे घडलेल्या दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर ‘लोकमत’ने आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा दक्ष आहे का, याची चाचपणी करण्यासाठी शुक्रवारी स्टिंग आॅपरेशन केले. त्यात आपत्कालीन कक्षात बराचवेळ कोणीही फिरकले नाही. शिवाय, आपत्कालीन कक्षाच्या २४३२३४ या दूरध्वनी क्रमांकावर वारंवार संपर्क साधून पाहिला. मात्र कक्षातून प्रतिसाद मिळाला नाही. याबाबतचे वृत्त शनिवारच्या अंकात झळकताच जिल्हा प्रशासनाने त्याची गंभीर दखल घेत तात्काळ कर्मचारी नियुक्त केला. (प्रतिनिधी)