हुतात्मा स्मारकांची दुरवस्था
By Admin | Updated: September 17, 2014 01:12 IST2014-09-17T00:37:03+5:302014-09-17T01:12:06+5:30
जालना : स्वातंत्र्यदिन तसेच मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनानिमित्त हुतात्म्यांच्या आठवणींना उजाळा रहावा म्हणून जिल्ह्यात पाच ठिकाणी उभारण्यात आलेल्या हुतात्मा स्मारकांची दुरवस्था झाली आहे.

हुतात्मा स्मारकांची दुरवस्था
जालना : स्वातंत्र्यदिन तसेच मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनानिमित्त हुतात्म्यांच्या आठवणींना उजाळा रहावा म्हणून जिल्ह्यात पाच ठिकाणी उभारण्यात आलेल्या हुतात्मा स्मारकांची दुरवस्था झाली आहे. काही ठिकाणी आवारातच अतिक्रमणे झाली तर कुठलीही सुविधा नसलेल्या स्मारकांचाही समावेश आहे.
संभाजी उद्यानासमोरील हुतात्मा स्मारक गेल्या अनेक वर्षांपासून अर्धवट संरक्षण भिंतीविना आहे. या स्मारकाच्या परिसरात दिवाबत्तीचीही असुविधा असून येथील सुविधांबाबत नगरपालिकेकडून दुर्लक्ष होत आहे.
या स्मारकाजवळ हुतात्मा जनार्दन मामा सार्वजनिक वाचनालय आहे. त्यामुळे दररोज वाचक येथे येतात. स्मारकाच्या आवारात काही भाग सखल असल्याने पावसाळ्यात येथे पाणी साचते. संरक्षण भिंत अर्धवट आहे. ती मागील बाजूनेच असल्याने समोरील भाग संरक्षण भिंतीविनाच आहे. सायंकाळनंतर येथील विद्युत दिवे बंदच असतात. त्यामुळे या भागात अंधार असतो. पालिकेने येथे सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.
या स्मारकाला संरक्षण भिंत नसल्याने आवारातील हिरवळीवर जनावरे चरण्यासाठी येतात. परिसरातच अन्य विभागांची कार्यालये असल्याने काही वाहनधारकांना तेथे जाण्याचा मार्ग स्मारकाजवळूनच झाला आहे.
भोकरदन तालुक्यात पिंपळगाव कोलते, धानोरा, जाफराबाद तालुक्यात वरूड बु, जालना तालुक्यातील मानेगाव या ठिकाणी हुतात्मा स्मारक बाधण्यात आलेले आहे.
जाफराबाद तालुक्यातीलच खापरखेडा गावातील अनेकांनी निजामाच्या राजवटीविरूद्ध लढा दिला. मात्र शासनाकडून या गावाची दखलच घेण्यात आली नाही. (प्रतिनिधी)
खापरखेडा या गावातील स्वातंत्र सैनिकांचे प्रस्ताव तसेच पडून असल्याची बाब समोर आली आहे.
४भोकरदन तालुक्यातील पिंपळगाव कोलते व धानोरा येथील हुतात्मा स्मारकांची योग्य देखरेखीअभावी मोठी दुरवस्था झाली आहे. त्यामुळे स्मारकांचे अस्तित्वच धोक्यात आले आहे.जाफराबाद तालुक्यातील माहोरा येथील हुतात्मा समारक अतिक्रमाणाच्या विळख्यात अडकले आहे. याकडे प्रशासनाने लक्ष देण्याची गरज आहे.