शहरं
Join us  
Trending Stories
1
"बाळासाहेबांची 'ती' इच्छा पूर्ण करा, शिवसेना उबाठा...."; शर्मिला ठाकरेंनी स्पष्टच सांगितलं
2
भाजपाचं 'अब की बार ४०० पार' कसं होणार?; विनोद तावडेंची भविष्यवाणी, गणित मांडलं
3
मिहिर कोटेचा यांच्या कार्यालयातून १.६४ लाख रुपये जप्त; ठाकरे गटाच्या कार्यकर्त्याविरुद्ध गुन्हा
4
Swati Maliwal : स्वाती मालीवाल यांचा आणखी एक Video आला समोर; 'त्या' दिवशी नेमकं काय घडलं?
5
"हे भरकटलेले लोक, त्यांनी..."; उद्धव ठाकरेंची नरेंद्र मोदी-राज ठाकरेंवर बोचरी टीका
6
Manoj Tiwari : "ते स्वत:च स्वत:वर हल्ला करू शकतात..."; मनोज तिवारींचा कन्हैया कुमार यांना खोचक टोला
7
मुक्ता बर्वेने या कारणामुळे अद्याप केलं नाही लग्न, स्वतःच केला खुलासा
8
Share Market News : 'या' सरकारी कंपनीचा शेअर बनला रॉकेट, 'ऑल टाईम हाय'वर; शेअर खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या
9
"लोकसभेच्या ४८ जागांपैकी आम्ही..."; काँग्रेसचा मोठा दावा, विजयी आकडाच सांगितला
10
मालदीवनंतर तैवान! संसदेत लाथाबुक्क्या; खासदार टेबलांवर उड्या मारू लागले
11
JP Nadda : "केजरीवालांचा पर्दाफाश, महिलांच्या अपमानावर गप्प का?"; जेपी नड्डा यांचं जोरदार प्रत्युत्तर
12
नरेंद्र मोदींच्या 'रोड शो' साठी मुंबई महापालिकेचा पैसा वापरला; संजय राऊतांचा आरोप
13
बाळासाहेबांच्या खोलीतील कधीही न ऐकलेला गौप्यस्फोट; देवेंद्र फडणवीस म्हणाले...
14
मुंबई इंडियन्स शेवटची मॅचही हरली! हार्दिक पांड्याने सगळे खापर टीमवर फोडले, म्हणतोय...
15
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीच्या कामकाजात तेजी, Nestle च्या शेअर्समध्ये तेजी, JSW घसरला
16
चिमुकल्याचा मृतदेह, रहस्यमय चिठ्ठी अन् 'ते' ७ शब्द; तांत्रिकाच्या मदतीनं अघोरी डाव?
17
किर्गिस्तानमध्ये स्थानिकांचा भारतीय, पाकिस्तानी विद्यार्थ्यांविरोधात हिंसाचार; तीन विद्यार्थ्यांची हत्या
18
Infosys नं वाढवली ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांची संपत्ती; पत्नीनंही केली मोठी कमाई, जाणून घ्या
19
तिकडे मोदींची सभा, इकडे ठाकरे गटाचा मिहीर कोटेचांच्या कार्यालयात जोरदार राडा
20
सोढीने केला संसार त्याग?; 25 दिवसानंतर गुरुचरण सिंगची घरवापसी, दिली पहिली प्रतिक्रिया

नामविस्ताराच्या रौप्यमहोत्सव दिनाला पाहुणे बोलावण्यावरून मतभेद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 29, 2018 11:42 PM

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या रौप्यमहोत्सवी नामविस्तार दिनाच्या कार्यक्रमाला शरद पवार यांना बोलावण्यात यावे, असा ठराव कुलगुरू डॉ. बी.ए. चोपडे यांनी व्यवस्थापन परिषदेच्या बुधवारी (दि.२८) झालेल्या बैठकीत मांडला.

ठळक मुद्दे विद्यापीठ : कुलगुरूंनी शरद पवार यांना बोलावण्याच्या मांडलेल्या ठरावावर निर्णय प्रलंबित

औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या रौप्यमहोत्सवी नामविस्तार दिनाच्या कार्यक्रमाला शरद पवार यांना बोलावण्यात यावे, असा ठराव कुलगुरू डॉ. बी.ए. चोपडे यांनी व्यवस्थापन परिषदेच्या बुधवारी (दि.२८) झालेल्या बैठकीत मांडला. मात्र, व्यवस्थापन परिषदेचे सदस्य किशोर शितोळे यांनी त्यास विरोध केल्यामुळे कोणताही निर्णय घेण्यात आला नसल्याचे सूत्रांनी सांगितले.ऐतिहासिक लढ्यानंतर मराठवाडा विद्यापीठाचा डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ असा नामविस्तार करण्याचा निर्णय तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार यांनी १४ जानेवारी १९९४ रोजी घेतला. येत्या १४ जानेवारी रोजी या घटनेला २५ वर्षे पूर्ण होत आहेत.संसदीय कारकीर्दीला ५० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त देवगिरी महाविद्यालयात सर्वपक्षीयांतर्फे माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांचा सत्कार करण्यात आला. त्यावेळी झालेल्या भेटीतच कुलगुरूंचे शरद पवार यांच्याशी रौप्यमहोत्सवी कार्यक्रमाला उपस्थित राहण्यासंदर्भात प्राथमिक बोलणे झाले होते. रौप्यमहोत्सव काही दिवसांवर आलेला आहे. यामुळे कुलगुरूंनी व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत शरद पवार यांना बोलावण्याचा ठराव मांडला होता. मात्र, किशोर शितोळे यांनी विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही बोलवावे, अशी मागणी केली. या मागणीला सर्व सदस्यांनी होकार दर्शविला. इतरही काही नावांची सूचना सदस्यांनी केली. तेव्हा कुलगुरूंनी या विषयावर मौन बाळगणेच पसंत केले. मात्र, बैठक मध्यंतरासाठी थांबली असता, शितोळे यांनी पुन्हा कुलगुरूंची भेट घेऊन शरद पवार यांच्याऐवजी केवळ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाच बोलावावे, त्यांच्याशिवाय इतर कोणीही पाहुणा आणू नये, अशी मागणी केली. यामुळेच कुलगुरूंनी नामविस्ताराला पाहुणा बोलवण्याचा विषयच प्रलंबित ठेवल्याचा आरोप डॉ. नरेंद्र काळे यांनी केला.कोट,विद्यापीठाच्या ऐतिहासिक नामविस्तारात महत्त्वाची भूमिका बजावलेल्या व्यक्तींना बोलावले पाहिजे. मात्र, ज्यांनी नामविस्ताराला विरोध केला त्या विचारसरणीच्या लोकांना बोलावण्याचा आग्रह करण्यात येत आहे. हे दुर्दैव आहे. सरकारचा धाक दाखवून कुलगुरूंवर दबाव आणण्याचा प्रयत्न होत आहे. मात्र, आम्ही चांगल्या निर्णयासाठी कुलगुरूंसोबत आहोत. त्यांनी भूमिका बदलू नये.- डॉ. नरेंद्र काळे, सदस्य, व्यवस्थापन परिषद------------------------नामविस्तार दिनाला तत्कालीन मुख्यमंत्र्यांना बोलावत असाल तर विद्यमान मुख्यमंत्र्यांनाही बोलावले पाहिजे, अशी मागणी केली. मात्र, सध्या ज्या काही चर्चा सुरू आहेत, त्या चुकीच्या आहेत. कुलगुरूंवर कोणताही दबाव आणलेला नाही.- किशोर शितोळे, सदस्य, व्यवस्थापन परिषद

टॅग्स :universityविद्यापीठPoliticsराजकारण