प्रेयसीने घेतला गैरफायदा; प्रियकराची आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2021 04:03 IST2021-07-19T04:03:56+5:302021-07-19T04:03:56+5:30
औरंगाबाद : विवाहित महिलेचे तरुणासोबत सूत जुळले. प्रेमाच्या आडून तिने त्याचा गैरफायदा घेतला. यानंतर त्याच्यासोबत राहण्यास नकार दिला. ...

प्रेयसीने घेतला गैरफायदा; प्रियकराची आत्महत्या
औरंगाबाद : विवाहित महिलेचे तरुणासोबत सूत जुळले. प्रेमाच्या आडून तिने त्याचा गैरफायदा घेतला. यानंतर त्याच्यासोबत राहण्यास नकार दिला. त्यामुळे निराश झालेल्या तरुणाने २४ जून रोजी सुसाईड नोट लिहून आत्महत्या केली. या प्रकरणात आत्महत्या केलेल्या तरुणाच्या वडिलांनी दिलेल्या फिर्यादीनुसार सातारा पोलीस ठाण्यात शनिवारी गुन्हा दाखल झाला.
तुषार गायकवाड (२९, रा. शिवाजीनगर, ठाणे) याचे एका विवाहितेसोबत प्रेमसंबंध होते. तीने अगोदर तुषारला प्रेमात ओढून गैरफायदा घेतला. मात्र त्याच्यासोबत राहण्यास नकार दिला होता. लॉकडाऊनच्या काळात तुषारसोबत तिची भेट झाली नव्हती. तीचा नकार मिळत असल्याचे त्याने सुसाईड नोटमध्ये नमूद केले आहे.
तुषारचे वडील संजय गोविंद गायकवाड (६०, रा. शिवाजीनगर, ठाणे) यांना २४ जून रोजी सकाळी सातारा पोलिसांनी संपर्क साधून तुषारचा अपघात झाल्याची माहिती दिली होती. त्यामुळे गायकवाड हे तत्काळ शहरात दाखल झाले. त्यांनी तुषारच्या मृतदेहावर ठाण्यातील शिवाजीनगरात अंत्यसंस्कार केले. दरम्यान, संजय गायकवाड यांना तुषारच्या बॅगेत एक चिठ्ठी सापडली. त्यामध्ये त्याने मृत्यूचे कारण तसेच मोबाइलमध्ये पुरावे असल्याचे नमूद केले होते. त्यावरून शनिवारी गायकवाड यांनी सातारा पोलीस ठाणे गाठत संबंधित महिलेविरुध्द तक्रार दिली. या प्रकरणाचा पुढील तपास उपनिरीक्षक विक्रम वडणे करत आहेत.