अपंग नसलेल्या शिक्षकाला मंजूर केली मिनी पिठाची गिरणी !
By Admin | Updated: February 5, 2015 00:54 IST2015-02-05T00:45:30+5:302015-02-05T00:54:32+5:30
निलंगा तालुक्यात जिल्हा परिषदेच्या अपंग पुनर्वसन योजनेत एकूण २० अपंगांना मिनी पिठाच्या गिरण्या मंजूर झाल्या आहेत.

अपंग नसलेल्या शिक्षकाला मंजूर केली मिनी पिठाची गिरणी !
निलंगा तालुक्यात जिल्हा परिषदेच्या अपंग पुनर्वसन योजनेत एकूण २० अपंगांना मिनी पिठाच्या गिरण्या मंजूर झाल्या आहेत. जिल्ह्यात वाटप झालेल्या गिरण्यांसारखीच निलंगा तालुक्यातीलही स्थिती सारखीच आहे. विशेष म्हणजे शिक्षक असलेल्या एका व्यक्तीच्या नावावर मिनी पिठाची गिरणी मंजूर आहे. शिक्षक दत्तात्रय पवार यांचे बंधू मात्र अपंग आहेत. चुकून जिल्हा परिषदेने शिक्षकाच्या नावावर ही गिरणी मंजूर केली आहे. चूक जिल्हा परिषदेची असली, तरी त्याचा फायदा पवार बंधूंनी घेतला नाही.
शिक्षक दत्तात्रय पवार यांच्या नावावर पिठाची गिरणी मंजूर असली तरी अपंग असलेले त्यांचे बंधू तुकाराम किशनराव पवार यांनी ही गिरणी नाकारली आहे. तथापि, गिरणी निलंगा पंचायत समितीतच जमा आहे.