विद्यापीठात दिव्यांग कर्मचाऱ्यांचा सत्कार
By | Updated: December 4, 2020 04:12 IST2020-12-04T04:12:05+5:302020-12-04T04:12:05+5:30
औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात जागतिक अपंग दिनानिमित्त कुलसचिव डॉ. जयश्री सूर्यवंशी यांच्या हस्ते दिव्यांग कर्मचाऱ्यांचा सत्कार ...

विद्यापीठात दिव्यांग कर्मचाऱ्यांचा सत्कार
औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात जागतिक अपंग दिनानिमित्त कुलसचिव डॉ. जयश्री सूर्यवंशी यांच्या हस्ते दिव्यांग कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. कुलसचिवांच्या दालनात गुरुवारी झालेल्या या कार्यक्रमास कार्यकारी अभियंता रवींद्र काळे, विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ. मुस्तजिब खान यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी अशोक लग्गड, मच्छिंद्र जगळदाळे, कौशल्या खरात, सविता जगताप, अंबादास खांड्रे, पुष्कराज साबळे, उषा जाधव आदींचा सत्कार करण्यात आला.