शहरं
Join us  
Trending Stories
1
ते कुणालाच नको होते; एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदाबाबत संजय राऊत यांचा नवा दावा
2
राष्ट्रवादीकडे त्यावेळी मुख्यमंत्रीपदासाठी योग्य उमेदवार नव्हता; शरद पवारांनी सगळंच सांगितलं
3
पतंजलीची सोन पापडी गुणवत्ता चाचणीत फेल, सहाय्यक व्यवस्थापकासह तिघांवर कारवाई
4
आनंदवार्ता : यंदा धो-धो बरसणार; मान्सून आज अंदमानात तर ३१ मे रोजी केरळात धडकणार
5
गॅसच्या टँकरचा भीषण स्फोट, आगीत घरे व वाहने भक्ष्यस्थानी; शेलपिंपळगावातील घटना
6
काश्मीरमध्ये निवडणुकीपूर्वी दुहेरी हल्ला; भाजपच्या माजी सरपंचाची गोळ्या झाडून हत्या
7
दिल्लीत महाभ्रष्टाचाऱ्याला इंडी आघाडीने स्वीकारले; काँग्रेसला ४ जागाही लढवता आल्या नाहीत, मोदींचा हल्लाबोल 
8
आजचे राशीभविष्य - १९ मे २०२४, अचानक धनलाभाची शक्यता,व्यावसायिक क्षेत्रात लाभ होतील
9
'हार मानणार नाही..'; कार्तिक आर्यनच्या 'चंदू चँपियन'चा ट्रेलर, मराठमोळ्या हेमांगी कवीने वेधलं लक्ष
10
मविआ राज्यात ४६ जागा जिंकणार; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी व्यक्त केला विश्वास
11
केजरीवाल यांचे माजी पीए बिभव कुमार अखेर अटकेत; स्वाती सहज बाहेर पडल्या, ‘आप’ने जारी केला व्हिडीओ 
12
'सिंघम 3' च्या सेटवरुन अजय देवगण-जॅकी श्रॉफचा फाईट सीन लीक, व्हिडीओ व्हायरल
13
आता भाजप सक्षम, सगळे निर्णय स्वबळावर; रा.स्व. संघाची मदत घेण्याबाबत जे.पी.नड्डा यांचे मत
14
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
15
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 
16
प्रज्वल रेवण्णांच्या अडचणीत वाढ, ब्लू कॉर्नर नोटीसनंतर अटक वॉरंट जारी
17
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
18
आम्ही भाजपावाले आहोत, आम्हाला घाबरणं माहिती नाही, पाकव्याप्त काश्मीरचा ताबा मिळवणारच- अमित शाह
19
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
20
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 

नाल्यांमधून घाण पाणी का वाहत आहे?; औरंगाबाद मनपात नगरसेवकांनी काढली भूमिगत गटार योजनेची लक्तरे 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 31, 2018 3:37 PM

भूमिगत गटार योजना पूर्ण करण्यासाठी ९८ कोटी रुपयांचे कर्ज घेण्याच्या मुद्यावरून मंगळवारी सर्वसाधारण सभेत तब्बल पाच तास चर्चा झाली. नगरसेवकांनी ३६५ कोटी रुपयांच्या या योजनेची अक्षरश: लक्तरेच बाहेर काढली. शहरातील नाल्यातून घाण पाणी वाहणार नाही, असा मनपाचा दावा होता मग आता सर्व नाल्यांमधून पाणी का वाहत आहे, असा सवाल नगरसेवकांनी केला.

औरंगाबाद : भूमिगत गटार योजना पूर्ण करण्यासाठी ९८ कोटी रुपयांचे कर्ज घेण्याच्या मुद्यावरून मंगळवारी सर्वसाधारण सभेत तब्बल पाच तास चर्चा झाली. नगरसेवकांनी ३६५ कोटी रुपयांच्या या योजनेची अक्षरश: लक्तरेच बाहेर काढली. शहरातील नाल्यातून घाण पाणी वाहणार नाही, असा मनपाचा दावा होता मग आता सर्व नाल्यांमधून पाणी का वाहत आहे, असा सवाल नगरसेवकांनी केला. सभागृहाचा मूड लक्षात घेऊन महापौर नंदकुमार घोडेले यांनी ८ फेब्रुवारीपर्यंत सभा तहकूब केली. विशेष बाब म्हणजे ही सभा तिस-यांदा तहकूब झाली आहे.

भूमिगत गटार योजना पूर्ण करण्यासाठी ९८ कोटी रुपये कर्ज घेण्याचा प्रस्ताव सभेसमोर होता. याआधी दोन वेळा हा प्रस्ताव आला होता व सभा तहकूब झाली होती. सभा सुरू होताच सर्वपक्षीय नगरसेवकांनी योजनेचा कसा सत्यानाश झालाय याचे वर्णन केले.  योजना सुरू करताना शहरातील एकाही नाल्यातून घाण पाणी वाहणार नाही, असा दावा मनपाचा होता. आज सर्वच नाल्यांमधून घाण पाणी वाहत आहे. कुठे गेले ३६५ कोटी रुपये, असा प्रश्नही यावेळी विचारण्यात आला. योजनेतील त्रुटी शोधण्यासाठी थर्ड पाटी आॅडिट करा, योजनेचे लेखापरीक्षण करा, अशी भाजपसह काही नगरसेवकांनी कर्ज घेण्याच्या मुद्यावर सभागृहात मतदान घ्या, अशी मागणी केली. महापौर नंदकुमार घोडेले यांनी ही मागणी फेटाळून लावत सभागृहात सखोल चर्चा व्हावी, अशी इच्छा व्यक्त केली. कर्जप्रकरणी महापौर एकतर्फी ठराव मंजूर करतील. असे वाटत असतानाच त्यांनी अचानक ८ फेब्रुवारीपर्यंत सभा तहकूब करून सर्वांचा आश्चर्याचा धक्का दिला.

१३८ कोटींचे अगोदरच कर्ज१९७७ पासून आजपर्यंत महापालिकेने विविध कारणांसाठी एलआयसी, बँकांकडून कर्ज घेतलेले आहे. आजही महापालिकेच्या डोक्यावर १३८ कोटी रुपयांचे कर्ज आहे. त्यात आणखी ९८ कोटींची भर पडल्यास कर्ज २३६ कोटींपर्यंत जाईल. ४कर्जाचे हफ्ते देण्याच्या नादात कर्मचाºयांचा पगारही अशक्य होईल. अगोदरच एलईडी दिवे लावण्याचे काम सुरू केले आहे. या कंपनीला दरमहा २ कोटी ७२ लाख रुपये द्यावे लागणार आहेत. सध्या लेखा विभागात ३३ कोटींची मोठी बिले प्रलंबित आहेत. पथदिव्यांचे वीज बिल १७ कोटी थकले आहे. खर्च जास्त उत्पन्न कमी, अशी अवस्था तिजोरीची असल्याचे मुख्य लेखाधिकारी राम सोळुंके यांनी नमूद केले.

कदम समर्थकांनी काढला खैरे गटाचा घामभूमिगत गटार योजनेच्या मुद्यावर सभेत शिवसेनेमध्ये उघडपणे दोन गट पडले. जिल्ह्याचे माजी पालकमंत्री रामदास कदम गटाच्या नगरसेवकांनी कर्ज घेण्याच्या मुद्यावर उघडपणे विरोध केला. त्यामुळे खैरे गटाचे नगरसेवक आणि पदाधिकारी घामाघूम झाले होते. त्र्यंबक तुपे, राजेंद्र जंजाळ या कदम समर्थक नगरसेवकांनी विरोध दर्शविला. सेनेच्या अंतर्गत वादाचा भाजप आणि एमआयएम पक्षाने पूर्णपणे फायदा उचलला त्यांनीही कर्ज घेण्यास विरोध दर्शविला. सभागृहनेता विकास जैन यांनी योजनेचे काम अंतिम टप्प्यात असून, उर्वरित काम होणे किती आवश्यक आहे, हे पटवून देण्याचा प्रयत्न केला. 

यावेळी महापौर नंदकुमार घोडेले आणि जंजाळ यांच्यात किंचित शाब्दिक चकमकही उडाली. जंजाळ सभागृह सोडून जाणार असताना काही ज्येष्ठ नगरसेवकांनी त्यांना शांत केले. सेनेतील ज्येष्ठ मंडळी योजनेला विरोध दर्शवीत होती. पक्षाची भूमिका नेमकी काय हे सेनेतील अनेक नगरसेवकांनाच माहीत नव्हते. त्यामुळे नगरसेवक आत्माराम पवार यांनीही चक्क विरोधकांच्या सुरात सूर मिसळवत ९८ कोटींच्या कर्जाला कडाडून विरोध दर्शविला. 

टॅग्स :Muncipal Corporationनगर पालिकाAurangabadऔरंगाबाद