महासंचालकांनी दिली धावती भेट

By Admin | Updated: August 26, 2014 23:55 IST2014-08-26T23:53:16+5:302014-08-26T23:55:59+5:30

हिंगोली : राज्याचे पोलीस महासंचालक संजीव दयाल यांनी २६ आॅगस्ट रोजी नांदेडकडे जात असताना हिंगोली येथे धावती भेट देऊन पाहणी केली.

The Director General gave a surprise visit | महासंचालकांनी दिली धावती भेट

महासंचालकांनी दिली धावती भेट

हिंगोली : राज्याचे पोलीस महासंचालक संजीव दयाल यांनी २६ आॅगस्ट रोजी नांदेडकडे जात असताना हिंगोली येथे धावती भेट देऊन पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या कामकाजाची पाहणी केली.
सार्वजनिक गणेशोत्सवाच्या पार्श्वभुमीवर बुधवारी नांदेड येथे वरिष्ठ अधिकाऱ्यांची महत्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीसाठी महासंचालक दयाल मंगळवारी सायंकाळी नांदेडकडे जात असताना औंढामार्गे हिंगोलीत आले. पोलीस अधीक्षक कार्यालयास भेट देऊन त्यांनी अधिकाऱ्यांशी चर्चा केली. प्रलंबित गुन्हे व गणेशोत्सवाच्या अनुषंगाने दयाल यांनी मार्गदर्शन केले. यावेळी पोलीस अधीक्षक एन.अंबिका, उपअधीक्षक सुनील लांजेवार, निलेश मोरे, पियुष जगताप, पोनि शंकर सिटीकर, सतिशकुमार टाक, दिलीप ठोंबळ यांच्यासह जिल्ह्यातील अधिकारी उपस्थित होते. संध्याकाळी साडेसातच्या सुमारास महासंचालक नांदेडकडे रवाना झाले. त्यांच्या या भेटीमुळे शांतता समितीच्या बैठकीस अधिकारी हजर नव्हते. (प्रतिनिधी)

 

Web Title: The Director General gave a surprise visit

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.