शालेय पोषण आहाराची थेट रक्कम खात्यात जमा होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2021 04:04 IST2021-06-29T04:04:26+5:302021-06-29T04:04:26+5:30

सोयगाव : प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना आता शालेय पोषण आहारातील धान्याऐवजी थेट खात्यावर रक्कम जमा होणार आहे. याबाबत अध्यादेश सोमवारी ...

Direct amount of school nutrition will be credited to the account | शालेय पोषण आहाराची थेट रक्कम खात्यात जमा होणार

शालेय पोषण आहाराची थेट रक्कम खात्यात जमा होणार

सोयगाव : प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना आता शालेय पोषण आहारातील धान्याऐवजी थेट खात्यावर रक्कम जमा होणार आहे. याबाबत अध्यादेश सोमवारी प्राथमिक शिक्षण संचालनालय विभागाने काढला आहे. या आदेशाची अंमलबजावणी करण्यासाठी जिल्हा शिक्षणाधिकाऱ्यांनी (प्राथमिक) विद्यार्थ्यांचे बँकेचे खाते उघडण्याचे आदेश प्राथमिक शाळांना दिले आहेत.

कोरोना संसर्गाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेसाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून गर्दी टाळण्यासाठी धान्याऐवजी थेट खात्यावर रक्कम जमा करण्याचा शासनाने निर्णय घेतला आहे. या अनुषंगाने जिल्ह्यातील प्राथमिक शाळांतील विद्यार्थ्यांचे बँकेत खाते उघडण्याचे आदेश मुख्याध्यापकांना देण्यात आले. शालेय पोषण आहारासाठी इयत्ता पहिली ते आठवीपर्यंतचे लाभार्थी पात्र आहेत. या विद्यार्थ्यांना कोरोना काळातही शाळांनी नियोजन करून गहू, तांदूळ आहाराचे वितरण केले. मात्र, तिसऱ्या लाटेचे गांभीर्य टाळण्यासाठी खात्यावर रक्कम जमा केली जाणार आहे.

चौकट

सोयगाव तालुक्यात १४ हजार २९५ विद्यार्थ्यांना होणार लाभ

सोयगाव तालुक्यात ११५ प्राथमिक शाळांमधील पहिली ते पाचवीसाठी ९,१७७ आणि सहावी ते आठवीसाठी ५,११८ विद्यार्थी पात्र आहेत. आता या विद्यार्थ्यांचे बँक खाते खोलण्याचे मुख्याध्यापकांना निर्देश आहेत.

Web Title: Direct amount of school nutrition will be credited to the account