शहरं
Join us  
Trending Stories
1
लाजीरवाण्या पराभवानंतर LSG चे मालक संतापले; कॅप्टन KL Rahul ला झापताना दिसले, Video
2
Fact Check: भारतात ३०० दहशतवादी घुसणार असल्याचे भाजपा अध्यक्ष जेपी नड्डा खरंच बोलले? जाणून घ्या सत्य
3
नागपूर मेडिकलच्या अधिष्ठात्यांसह ११ डॉक्टरांविरोधात गुन्हा, निष्काळजीपणाचा ठपका!
4
"मी विरोध केला नाही, 'त्या' पोझिशनमध्ये केवळ छताकडे बघत राहिले अन् डोनाल्ड ट्रम्प..."; पॉर्न स्टारचे खळबळजनक खुलासे
5
ना कोहली... ना रोहित...; ब्रायन लाराला वाटतं, हा युवा फलंदाज मोडू शकतो त्याचा 400 धावांचा रेकॉर्ड
6
Chandrayaan-3 नं इतिहास रचला; आता चंद्रासंदर्भात आली आणखी एक आनंदाची बातमी! जाणून घ्या, काय सापडलं?
7
सनरायझर्स हैदराबादने ९.४ षटकांत कुटल्या विजयी १६७ धावा, Mumbai Indians चे आव्हान संपुष्टात आणले
8
१६७ धावा, ९.४ षटकं, १६ चौकार, १४ षटकार! SRH चा चमत्कार, अभिषेक-ट्रॅव्हिस यांनी मोडला १६ वर्षांपूर्वीचा विक्रम
9
शरद पवारांकडे पक्ष विलिनीकरणाशिवाय पर्याय नाही; चंद्रशेखर बावनकुळे यांची खरमरीत टीका
10
माझे शब्दच हरवले आहेत, ही काल्पनिक फलंदाजी; बेक्कार हरल्यानंतर KL Rahul ला काहीच सूचेना
11
आमदाराच्या स्वीय्य सहाय्यकाच्या अपघाती मृत्यू प्रकरणी ट्रकचालकास अटक व सुटका
12
भारतीय अर्थव्यवस्था 8% दराने वाढणार; देशाच्या मुख्य आर्थिक सल्लागारांनी व्यक्त केला विश्वास
13
'इंडिया' आघाडी भ्रष्टाचारी; भाजपकडे नेता, नीती अन् विकासाचा कार्यक्रम तयार: अमित शाह
14
ट्रॅव्हिड हेडने कुटल्या १२ चेंडूंत ५८ धावा! अभिषेक शर्मासह ३६ चेंडूंत फलकावर चढवल्या १०७ धावा
15
महा-बीसीए, बीबीए, एमसीए, एमबीए CET प्रवेश परीक्षा २९ मे रोजी; सुधारित वेळापत्रक जाहीर
16
भारताच्या लोकसंख्येत हिंदू 6 टक्क्यांनी घटले, मुस्लीम समाजाचा टक्का वाढला; सरकारी पॅनलनं केला 65 वर्षांचा अभ्यास
17
Air India ने 80 उड्डाणे रद्द केल्याबद्दल मागितली प्रवाशांची माफी; तिकीटाचे पैसेही परत करणार...
18
काँग्रेसची धुळधाण हीच खरी देशभक्ती; एकनाथ शिंदेंची संगमनेरात जोरदार टीका
19
मी दक्षिण भारतातील असून भारतीय दिसते; अभिनेत्रीचं सॅम पित्रोदांना चोख प्रत्युत्तर
20
इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेत नोकरीची संधी, 'या' तारखेपूर्वी उमेदवार करू शकतात अर्ज

दिनेश परदेशी भाजपमध्ये

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2018 12:41 AM

शहरातील काँग्रेसचे दिग्गज नेते तथा माजी नगराध्यक्ष डॉ. दिनेश परदेशी यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याने गेल्या आठ दिवसांपासून सुरू असलेल्या राजकीय चर्चांना गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर पूर्णविराम मिळाला. विशेष म्हणजे वैजापूर न.प. निवडणुकीच्या तोंडावर हा प्रवेश झाल्याने तालुक्यात खळबळ उडाली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवैजापूर : शहरातील काँग्रेसचे दिग्गज नेते तथा माजी नगराध्यक्ष डॉ. दिनेश परदेशी यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याने गेल्या आठ दिवसांपासून सुरू असलेल्या राजकीय चर्चांना गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर पूर्णविराम मिळाला. विशेष म्हणजे वैजापूर न.प. निवडणुकीच्या तोंडावर हा प्रवेश झाल्याने तालुक्यात खळबळ उडाली आहे.भाजपचे प्रदेशाध्यक्ष खा. रावसाहेब दानवे यांच्या औरंगाबादमधील निवासस्थानी हा प्रवेश सोहळा घेण्यात आला. यावेळी खा. दानवे यांच्यासह डॉ. भागवत कराड, जिल्हाध्यक्ष एकनाथ जाधव, अल्पसंख्याक जिल्हाध्यक्ष नबी पटेल तिडीकर, युवक मोर्चाचे जिल्हाध्यक्ष विजय औताडे, माजी नगराध्यक्षा शिल्पा परदेशी आदींची प्रमुख उपस्थिती होती. याशिवाय माजी नगराध्यक्ष राजूसिंह राजपूत, राष्ट्रवादीचे माजी उपनगराध्यक्ष मजीद कुरेशी, माजी नगरसेवक सुलतान कुरेशी, माजी नगरसेवक हिकमत काका, महंमद नूर कुरेशी, विजय व्यवहारे, फेरोज पठाण, शिवसेनचे माजी तालुकाप्रमुख खुशालसिंग राजपूत, राष्ट्रवादीचे हमीद कुरेशी, शिवसेनेचे शैलेश चव्हाण, काँग्रेसचे युवराज चेळेकर, माजी नगरसेवक दशरथ बनकर, जाकीर कुरेशी, चेअरमन राजेश संचेती, मर्चंट बँकेचे संचालक मनोज छाजेड, नितीन सोमाणी, सावनसिंग राजपूत, युवक काँग्रेसचे शहरप्रमुख वाजेद कुरेशी, नासेर चाऊस, शकील पठाण, राज मोहंमद शेख यांच्यासह काँग्रेस, राष्ट्रवादीच्या शेकडो कार्यकर्त्यांनीही भाजपत प्रवेश घेतला.वैजापूर शहरात रॅली काढून जल्लोषप्रवेश सोहळा झाल्यावर भाजपच्या वतीने वैजापूर शहरात रॅली काढून जल्लोष करण्यात आला. तालुक्यात २००२ पासून काँग्रेसच्या राजकारणात डॉ. दिनेश परदेशी यांची भूमिका मोठीच होती. मात्र, न.प. निवडणूक जाहीर झाल्यानंतर राजकीय हालचालींनी वेग घेतला. आठ दिवसांपासून डॉ. परदेशी मुंबईत असल्याने तालुक्यात अनेक चर्चांना उधाण आले होते. काँग्रेस नेत्यांनीही डॉ. परदेशी यांना रोखण्याचा प्रयत्न केला; परंतु त्यांना यश आले नाही. वैजापूर नगर परिषदेची निवडणूक येत्या ६ एप्रिल रोजी होणार आहे. परदेशी यांनी ऐन निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेस पक्ष सोडल्याने याचे पडसाद निवडणुकीत उमटणार आहेत. आतापर्यंत सर्व निवडणुकांचे सेनापती म्हणून परदेशी यांनीच वैजापूर नगरपालिकेची कमान सांभाळली आहे.