पावसासाठी दिंडी
By Admin | Updated: August 13, 2014 00:25 IST2014-08-13T00:14:22+5:302014-08-13T00:25:41+5:30
कडोळी : सेनगाव तालुक्यातील कडोळी येथील श्री रमतेराम महाराज संस्थानमध्ये ग्रामस्थांनी पावसासाठी आराधना सुरू केली आहे.

पावसासाठी दिंडी
कडोळी : सेनगाव तालुक्यातील कडोळी येथील श्री रमतेराम महाराज संस्थानमध्ये ग्रामस्थांनी पावसासाठी आराधना सुरू केली आहे. यासाठी ११ आॅगस्ट रोजी ग्रामस्थांनी घागरीने पाणी आणून महादेव मंदिराचा गाभारा भरून टाकला.
कडोळी येथे गंगाधर महाराज, विश्वनाथ महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली मंदिराचा गाभारा पाण्याने भरण्यात आला आहे. ग्रामस्थांनी गावातील प्रत्येक मंदिरात जाऊन देवाला साकडे घातले. यानिमित्त्त गावातून दिंंडी काढून नंतर विविध प्रकारच्या वृक्षांच्या डहाळ्या आणून होम करण्यात आला. (वार्ताहर)