मांजरा कारखान्याच्या चेअरमनपदी दिलीपराव देशमुख यांची बिनविरोध निवड
By Admin | Updated: April 22, 2015 00:40 IST2015-04-22T00:32:08+5:302015-04-22T00:40:09+5:30
लातूर : मांजरा शेतकरी सहकारी साखर कारखाना निवडणुकीत संचालक मंडळाने विक्रमी मतांनी विजय नोंदवला़ या संचालक मंडळाची विशेष सभा निवडणूक निर्णय अधिकारी डॉ़ प्रताप काळे

मांजरा कारखान्याच्या चेअरमनपदी दिलीपराव देशमुख यांची बिनविरोध निवड
लातूर : मांजरा शेतकरी सहकारी साखर कारखाना निवडणुकीत संचालक मंडळाने विक्रमी मतांनी विजय नोंदवला़ या संचालक मंडळाची विशेष सभा निवडणूक निर्णय अधिकारी डॉ़ प्रताप काळे यांच्या अध्यक्षतेखाली व सहायक निवडणूक निर्णय अधिकारी मधुकर गुंजकर यांच्या उपस्थितीमध्ये चेअरमनपदी आ़ दिलीपराव देशमुख यांची तर व्हॉईस चेअरमनपदी श्रीशैल्य उटगे यांची बिनविरोध निवड करण्यात आली़
आपल्या निवडीबद्दल नूतन संचालक आ़ दिलीपराव देशमुख म्हणाले, लोकनेते विलासराव देशमुख स्वर्गीय बी़ व्ही़ काळे यांनी ज्या उद्देशाने मांजरा साखर कारखाना उभा केला़ तो उद्देश सार्थ झाल्याचे आपण प्रत्यक्षात पहात आहोत़ विकासाचा एक टप्पा पार केल्यानंतर आता विकासाच्या दुसऱ्या टप्प्याकडे आपण वाटचाल करणार असून, सध्या महाराष्ट्रात मांजरा करखाना पहिल्या पाच कारखान्यांमध्ये गणला जातो़ त्यामुळे भविष्यात कायम नंबर एक वर मांजरा कारखाना कसा विराजमान होईल, यासाठी आपले प्रयत्न असल्याचे सांगून त्यांनी संचालक मंडळाचे, सभासदांचे आभार व्यक्त केले़
यावेळी मांजरा कारखान्याचे नूतन संचालक माजी राज्यमंत्री आ़ अमित देशमुख म्हणाले की, सहकार क्षेत्रात मांजरा कारखान्याने केलेली प्रगती ही लोकनेते विलासराव देशमुख, बी़व्ही़ काळे, दिलीपराव देशमुख व त्यांच्या असंख्य सहकार्यांनी केलेल्या अपार कष्टातून ही प्रगती साधता आली़ लोकनेते विलासराव देशमुख यांनी सुरू केलेल्या या कारखान्यावर संचालक म्हणून आपणास काम करता येत असल्याचे समाधान असून चेअरमनपदी आ़ दिलीपराव देशमुख यांची झालेली निवड ही सार्थ निवड आहे़ त्यांच्या मार्गदर्शनात मांजरा साखर कारखान्याचे भविष्य उज्वल असल्याचे ते म्हणाले़
मांजरा साखर कारखान्याच्या व्हॉईस चेअरमनपदी आपली निवड केल्याबद्दल श्रीशैल्य उटगे यांनी नेत्यांचे व संचालक मंडळाचे आभार व्यक्त करून नेत्यांनी जो विश्वास आपणावर टाकला आहे, तो विश्वास प्रत्यक्षात कृतीतून काम करून सार्थ ठरविण्यासाठी आपण प्रामाणिक प्रयत्न करणार असल्याचे ते म्हणाले़ यावेळी नूतन चेअरमन व व्हॉईस चेअरमन व मावळते चेअरमन धनंजय देशमुख, मावळते व्हॉईस चेअरमन जगदिश बावणे, कार्यकारी संचालक दत्ता शिंदे, तसेच सर्व आजी व माजी संचालकांनी पुष्पगुच्छ देवून सत्कार केला़ यावेळी आ़ त्रिंबक भिसे , रेणा करखान्याचे अध्यक्ष आबासाहेब पाटील, व्हॉईस चेअरमन सर्जेराव मोरे, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विक्रम हिप्परकर, नाथसिंह देशुख, विजय देशमुख आदींची उपस्थिती होती़