दिलासा, जिल्ह्यातील कोरोनाचे सक्रिय रुग्ण तीनशेखाली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2021 04:04 IST2021-07-19T04:04:36+5:302021-07-19T04:04:36+5:30
औरंगाबाद : जिल्ह्यात रविवारी सक्रिय म्हणजे उपचार सुरू असलेल्या कोरोना रुग्णांची संख्या तीनशेखाली गेली. दिवसभरात ३१ नव्या कोरोना रुग्णांची ...

दिलासा, जिल्ह्यातील कोरोनाचे सक्रिय रुग्ण तीनशेखाली
औरंगाबाद : जिल्ह्यात रविवारी सक्रिय म्हणजे उपचार सुरू असलेल्या कोरोना रुग्णांची संख्या तीनशेखाली गेली. दिवसभरात ३१ नव्या कोरोना रुग्णांची भर पडली. यात मनपा हद्दीतील १२, ग्रामीण भागातील १९ रुग्णांचा समावेश आहे. दिवसभरात ६२ जणांना सुटी देण्यात आली. तर उपचार सुरू असताना २ रुग्णांचा मृत्यू झाला.
जिल्ह्यात सध्या २७९ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. यात ग्रामीण भागातील २५८ आणि शहरातील २१ रुग्णांचा समावेश आहे. कोरोना रुग्णांची एकूण संख्या १ लाख ४६ हजार ९७२ झाली आहे. यापैकी जिल्ह्यात आतापर्यंत १ लाख ४३ हजार २२० रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. आजपर्यंत ३,४७३ रुग्णांचा मृत्यू झाला. मनपा हद्दीतील १७ आणि ग्रामीण भागातील ४५ अशा ६२ रुग्णांना रविवारी सुटी देण्यात आली. उपचार सुरू असताना वैजापूर येथील ६६ वर्षीय पुरुष, औरंगाबादेतील बंजारा काॅलनीतील ७८ वर्षीय पुरुषाचा मृत्यू झाला.
मनपा हद्दीतील रुग्ण
भावसिंगपुरा १, कैलासनगर १, संजीवनी कॉलनी १, यासह विविध भागांत ९ रुग्णांची वाढ झाली.
ग्रामीण भागातील रुग्ण
गंगापूर २, कन्नड २, सिल्लोड २, वैजापूर १०, पैठण ३