निवडणुकीत डिजिटल वॉर
By Admin | Updated: April 15, 2015 00:42 IST2015-04-15T00:32:27+5:302015-04-15T00:42:13+5:30
औसा : पूर्वी गावांमधील चौकात एखादे डिजिटल बॅनर लागले तर लोक त्याकडे कुतूहलाने पहायचे़ पण आता कुठला कार्यक्रम असो कुणाची सभा असो अथवा जयंती

निवडणुकीत डिजिटल वॉर
औसा : पूर्वी गावांमधील चौकात एखादे डिजिटल बॅनर लागले तर लोक त्याकडे कुतूहलाने पहायचे़ पण आता कुठला कार्यक्रम असो कुणाची सभा असो अथवा जयंती, पुण्यतिथी असो त्यासाठी डिजिटल बॅनर सर्वसामान्य झाले आहे़ वाढदिवस शुभेच्छासाठी लागणाऱ्या बॅनरचे लोण आता ग्रामीण भागातही पसरले आहे़ आता होत असलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये तर डिजिटल वॉरच सुरु झाले आहे़ वॉर्डा-वॉर्डात वेगळे तर गावच्या मुख्य चौकात सर्व उमेदवाराचे एकत्रित असे डिजिटल बॅनर गावागावात पहायला मिळत आहे़
औसा तालुक्यातील ४१ ग्रामपंचायतीच्या निवडणुका २२ एप्रिल रोजी होत आहेत़
तालुक्यातील राजकीयदृष्ट्या अनेक महत्वाच्या गावात या निवडणुका होत आहेत़ ग्रामपंचायतीची निवडणूक ही राजकीय जीवनाची एबीसीडी मानली जाते़ शासनाचा निधी थेट ग्रामपंचायतीला मिळत असल्याने सरपंचपदाला महत्व आले आहे़ उपसरपंचपदासाठी अनेकांनी फिल्डिंग लावली आहे़ निवडणुकीत उमेदवारांना खर्चाची मर्यादा असली तरी अनेकांनी त्यातून मार्ग कसा काढायचा याचा शोध घेऊन खर्च करताना दिसत आहेत़