पालिकेची डिजिटल सिग्निचर नादुरुस्त, अनेक निविदा रखडल्या
By Admin | Updated: May 22, 2017 00:13 IST2017-05-22T00:11:43+5:302017-05-22T00:13:18+5:30
जालना : नगर पालिका अभियंत्यांची डिजिटल सिग्निचर नादुरूस्त झाल्याने निविदा प्र्रकिया रखडली आहे.

पालिकेची डिजिटल सिग्निचर नादुरुस्त, अनेक निविदा रखडल्या
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : नगर पालिका अभियंत्यांची डिजिटल सिग्निचर नादुरूस्त झाल्याने निविदा प्र्रकिया रखडली आहे. गत पंधरा दिवसांपासून दुरूस्ती प्रक्रिया सुरू असली तरी अद्याप सदर डिवाईस दुरूस्त होऊ शकलेले नाही.
आॅनलाईन टेंडर पद्धती असल्याने पालिकेचे मुख्याधिकारी तसेच संबंधित अभियंता यांची डिजिटल सिग्नेचर घेण्यात येते. मात्र सदर डिवाईस नादुरूस्त झाल्याने सुमारे सात ते आठ महत्वाच्या निविदा रखडल्या आहेत. मुख्याधिकारी संतोष खांडेकर यांच्यासह अभियंता रत्नाकर आडसिरे यांची डिजिटल स्वाक्षरी निविदा उघडण्यासाठी आवश्यक आहे. निविदा उघडण्यासाठी दोन स्वाक्षऱ्या आवश्यक असतात. त्यापैकी खांडेकर यांची डिजिटल सिग्निचर होत असली तरी आडसिरे यांची नसल्यामुळे समस्या वाढली आहे.
महात्मा फुले बाजारपेठ परिसरातील मोकळ्या जागेचा लिलाव, डस्टबिन खरेदी निविदा आदी महत्वाच्या निविदा गत महिनाभरापासून या सहीअभावी अडकून पडल्या आहेत. हे डिवाईस दुरूस्त करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयातील माहिती तंत्रज्ञान विभाग तसेच अन्य खाजगी तंत्रज्ञाकडे पालिकेचा संपर्क सुरू असल्याचे मुख्याधिकारी संतोष खांडेकर यांनी सांगितले. सदर डिवाईस इनअॅक्टीव्ह अथवा करप्ट झाल्यामुळे सदर समस्या निर्माण झाल्याचे खांडेकर यांचे म्हणणे आहे. निविदा उघडण्यासाठी दोन स्वाक्षऱ्यांची गरज असल्याने निविदा प्रक्रियेची कामे ठप्प आहेत.