दिगंबर जैन पंचायतची कार्यकारिणी जाहीर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 04:18 IST2021-02-05T04:18:16+5:302021-02-05T04:18:16+5:30
औरंगाबाद : राजाबजार खंडेलवाल दिगंबर जैन पंचायतच्या अध्यक्षपदी ललित पाटणी यांची सलग चौथ्यांदा निवड करण्यात आली, तर सचिवपदी अशोक ...

दिगंबर जैन पंचायतची कार्यकारिणी जाहीर
औरंगाबाद : राजाबजार खंडेलवाल दिगंबर जैन पंचायतच्या अध्यक्षपदी ललित पाटणी यांची सलग चौथ्यांदा निवड करण्यात आली, तर सचिवपदी अशोक अजमेरा यांची तिसऱ्यांदा निवड करण्यात आली आहे.
खंडेलवाल दिगंबर जैन पंचायत पार्श्वनाथ मंदिरत सर्वसाधारण सभा नुकतीच पार पडली. यात निवडण्यात आलेल्या उर्वरित कार्यकारिणीत उपाध्यक्ष विनोद लोहाडे, सहसचिव नरेंद्र अजमेरा यांचा समावेश आहे. या बिनविरोध निवडीसाठी भागचंदजी बिनायके व दिलीप ठोले यांचे विशेष सहकार्य मिळाले. याशिवाय विश्वस्थ मंडळाचीही यावेळी निवड करण्यात आली. यात अध्यक्ष म्हणून ललित पाटणी, सचिव अशोक अजमेरा, विश्वस्थ अॅड. एम.आर. बडजाते, महावीर पाटणी, चांदमल चांदीवाल, किरण पहाडे, प्रकाश अजमेरा, डॉ. रमेश बडजाते, महेंद्र ठोळे, डॉ. जितेंद्र पहाडे, महावीर मिश्रीलाल ठोले यांचा समावेश आहे. कार्यकारिणी सदस्य म्हणून दिलीप कासलीवाल, प्रमोद पांडे, आनंद सेठी, अॅड. प्रमोद पाटणी, अशोक छाबडा, मनोज चांदीवाल, अॅड. अनिल कासलीवाल, भरत पापडीवाल, मनोज छाबडा, संतोष अजमेरा, अनुप पाटणी, रवींद्र पहाडे, संजीव लोहाडे, मुकेश गंगवाल, शुभम छाबडा, कश्मिरा लोहाडे यांचा समावेश आहे. यावेळी देवेंद्र काला व बी.आर. सोनी यांनी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम पाहिले.