मीटर निघाले डिफॉल्टी !

By Admin | Updated: October 1, 2016 01:17 IST2016-10-01T01:07:05+5:302016-10-01T01:17:46+5:30

भालचंद्र येडवे , लातूर लातूर परिमंडळाच्या महावितरण कंपनीकडून बसविण्यात आलेल्या एकूण साडेचार लाख मीटरपैकी तब्बल ७० टक्के मीटर डिफॉल्टी निघाले आहेत़

Diffatti meter! | मीटर निघाले डिफॉल्टी !

मीटर निघाले डिफॉल्टी !


भालचंद्र येडवे , लातूर
लातूर परिमंडळाच्या महावितरण कंपनीकडून बसविण्यात आलेल्या एकूण साडेचार लाख मीटरपैकी तब्बल ७० टक्के मीटर डिफॉल्टी निघाले आहेत़ त्यामुळे महावितरणने आत्तापर्यंत ११६८९ मीटर ग्राहकांना बदलून दिले आहेत़ आलेल्या तक्रारीनुसार अन्य मीटरची तपासणी सुरू आहे़
लातूर परिमंडळाअंतर्गत जिल्ह्यात सुमारे साडेचार लाखांच्या आसपास वीज ग्राहकांची संख्या आहे. महावितरण कंपनीकडून पूर्वीचे जुने मीटर बदलून नव्याने इलेक्ट्रॉनिक्स मीटर बसविण्यात आले आहेत. मात्र मीटर फॉल्टीमुळे बील अव्वाच्या सव्वा येवू लागले़ परिणामी, महावितरण कार्यालयात अनेक ग्राहकांनी तक्रारी नोंदविल्या आहेत़ या तक्रारीनुसार जुलै महिन्यात ६३, आॅगस्ट महिन्यात ७३, सप्टेंबर महिन्यात १०९, आॅक्टोबर महिन्यात ७९, नोव्हेंबर महिन्यात १०३, डिसेंबर २१६, जानेवारीत १५८, फेब्रुवारी १५९, मार्च १४५ आणि त्यानंतर महिन्याला सरासरी शंभर ते दीडशे मीटरची टेस्टींग करण्यात आली़ असता त्यातील ७० टक्के मीटर डिफॉल्टी निघाले आहेत़ सद्याही बील जास्त येत असल्याने तक्रारींचा ओघ ग्राहकांकडून सुरूच आहे़ त्यामुळे महावितरणने आलेल्या तक्रारीच्या अनुषंगाने मीटरची टेस्टींग सुरू केली आहे़ टेस्टींगमध्येही ७० टक्के मीटर डिफॉल्टी निघाले आहेत़ टेस्टिंग झालेल्या आणि डिफॉल्टी निघालेले मीटर बदलून देण्याची कार्यवाही महावितरणने सुरू केली आहे़ काही मीटर बदलूनही दिले आहेत़

Web Title: Diffatti meter!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.