डिझेल स्वस्त; ट्रॅव्हल्स, मालवाहतुकीचे काय?

By Admin | Updated: November 2, 2014 00:23 IST2014-11-02T00:11:50+5:302014-11-02T00:23:02+5:30

औरंगाबाद - आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या भावाने नीचांक गाठल्याने तीन महिन्यांत डिझेलचे दर लिटरमागे तब्बल सहा रुपयांनी कमी झाले आहेत.

Diesel is cheap; Travels, what about the cargo? | डिझेल स्वस्त; ट्रॅव्हल्स, मालवाहतुकीचे काय?

डिझेल स्वस्त; ट्रॅव्हल्स, मालवाहतुकीचे काय?

औरंगाबाद - आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या भावाने नीचांक गाठल्याने तीन महिन्यांत डिझेलचे दर लिटरमागे तब्बल सहा रुपयांनी कमी झाले आहेत. मात्र, ट्रॅव्हल्स अथवा मालवाहतूकदारांनी दरांमध्ये कुठलाच बदल न केल्याने जीवनावश्यक वस्तूंचे भाव ‘जैसे थे’ आहेत.
चालू वर्षाच्या पहिल्या सहा महिन्यांत डिझेलचे भाव प्रतिलिटरमागे ५ रुपये ४२ पैशांनी वाढले होते. त्यामुळे खाजगी बसमालकांनी प्रतितिकिटामागे ५० रुपयांची वाढ केली होती. आॅगस्ट महिन्यात मालवाहतुकीचे भाडे ५ टक्क्यांनी वाढले. यामुळे जीवनावश्यक वस्तूंच्या किमती गगनाला भिडल्या.
गेल्या दोन महिन्यांत आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे भाव प्रतिबॅरल ११५ अमेरिकी डॉलरवरून ८२ डॉलर झाले. त्यामुळे १ आॅगस्टपासून तेल कंपन्यांनीही पेट्रोल व डिझेलचे भाव कमी करणे सुरू केले. मागील तीन महिन्यांत ६ वेळा पेट्रोलचे भाव कमी झाले. पेट्रोल लिटरमागे ८ रुपये ७२ पैशांनी, तर डिझेल ६ रुपये ६२ पैशांनी कमी झाले. एरव्ही डिझेलचा भाव वाढला तर लगेच आपले भाडे वाढविणारे खाजगी बस व मालवाहतूकदार मागील ३ महिन्यांत डिझेलचा भाव उतरला तरीही कुठलाच निर्णय घेताना दिसत नाहीत.

Web Title: Diesel is cheap; Travels, what about the cargo?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.