सूूरजमल जैन बनले धर्मगुप्तजी महाराज
By Admin | Updated: October 15, 2016 01:20 IST2016-10-15T01:08:59+5:302016-10-15T01:20:09+5:30
औरंगाबाद : आचार्य गुप्तीनंदीजी गुरुदेव यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित दीक्षा सोहळ्यात राजस्थान येथील ब्रह्मचारी सूरजमल जैन यांनी जैनेश्वरी दीक्षा घेतली.

सूूरजमल जैन बनले धर्मगुप्तजी महाराज
औरंगाबाद : आचार्य गुप्तीनंदीजी गुरुदेव यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित दीक्षा सोहळ्यात राजस्थान येथील ब्रह्मचारी सूरजमल जैन यांनी जैनेश्वरी दीक्षा घेतली. दीक्षा घेतल्यानंतर त्यांचे नामकरण धर्मगुप्तजी महाराज असे करण्यात आले.
हिराचंद कस्तुरचंद कासलीवाल महाविद्यालय प्रांगणात दीक्षा सोहळ्याला सकाळी सुरुवात झाली. प्रथम सूरजमल जैन यांचा केसलोच विधी पार पडला. आचार्य गुप्तीनंदीजी गुरुदेव यांनी त्यांच्यावर जैनेश्वरी दीक्षाचे संस्कार केले. त्यानंतर त्यांचे क्षुल्लक धर्मगुप्तजी महाराज असे नामकरण करण्यात आले.
यावेळी मुनीश्री सुयशगुप्तीजी, मुनीश्री चंद्रगुप्तजी, आर्यिका कुलभूषणमती माताजी, आर्यिका सुनितीमती माताजी, आर्यिका सुनिधीमती माताजी, आर्यिका विनम्रमती माताजी यांची प्रमुख उपस्थिती होती. आचार्य गुप्तीनंदीजी गुरुदेव यांनी यावेळी जैन धर्मामध्ये जैनेश्वरी दीक्षाचे महत्त्व विशद केले. हा सोहळा पाहण्यासाठी राजस्थानातील लोहारिया येथील शेकडो भाविक आले होते. हजारो भाविकांनी दीक्षा घेणाऱ्यांचा जयजयकार केला. क्षुल्लक धर्मगुप्तजी महाराज यांना पिच्छी देण्याचा मान कान्हादेवी जैन, प्रदीप जैन यांना मिळाला. शास्त्राचा मान रतिलाल जैन यांना मिळाला. कमंडलूचा मान मनोज कोठारी यांना मिळाला.
दीक्षा महोत्सवात राजस्थान, भिलवाडा, मुंबई, नाशिक, नांदगाव, आडूळ, पाचोड, कन्नड, वैजापूर, देवगाव रंगारी, चापानेर तसेच शहरातील हजारो भाविक सहभागी झाले होते.
दीक्षा सोहळा यशस्वीतेसाठी खंडेलवाल दिगंबर जैन पंचायत पार्श्वनाथ मंदिर विश्वस्त व कार्यकारिणी मंडळ, चातुर्मास समिती व तीस चौबीस विधान समिती, कुंथुनाथ युवा संघाच्या पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले.