शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
5
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
6
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
7
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
8
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
9
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
10
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
12
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
13
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
14
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
15
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
16
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
17
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
18
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
19
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
20
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
Daily Top 2Weekly Top 5

Video: धुळवडीच्या रंगाचा झाला बेरंग; ट्रक-टेम्पोच्या भीषण अपघातात तीन ठार

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 19, 2022 06:54 IST

शिर्डी येथून दर्शन घेऊन परत येत असताना झाला अपघात, मृतांमध्ये दोन अभियंत्याचा समावेश

गंगापूर ( औरंगाबाद): गंगापूर-वैजापूर मार्गावर शहरापासून आठ किमी अंतरावर शुक्रवारी (१८) रोजी रात्री उसाचा ट्रक व टेम्पोचा अपघात होऊन तीन तरुण ठार झाले तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. रोहित अरविंद सुरवसे, आकाश क्षिरसागर दोघे सोलापूर,गणेश पप्पू शिरसाठ रा.आष्टी,बीड असे अपघातात ठार झालेल्या तरुणांची नाव आहे.

जालना मार्गावरील करमाड येथे रेल्वे बोगद्याचे काम चालू असून होळी निमित्ताने सुट्टी असल्याने येथील कामावरील चौघेजण कंपनीचा टेम्पो ( एम.एच.१३ सी.यु.१५०० ) घेऊन शिर्डी येथे गेले होते; दर्शन करुन परत येत असतांना गंगापूर वैजापूर मार्गावर  रात्री दहाच्या सुमारास वैजापूरकडे जाणार्या ऊसाचा ट्रक (एम.एच.१८ ए.ए.२७३७ ) व टेम्पोचा समोररासमोर भीषण अपघात झाला; यात टेम्पोतील गंभीर जखमी चौघांना येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असता तिघांना डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले तर जखमी शिवशंकर सांघवी रा. चाकूर यास प्राथमिक उपचारानंतर औरंगाबाद घाटी येथे पुढील उपचारासाठी पाठवण्यात आले.

 मृत तिघांपैकी गणेश आणि आकाश अभियंते असून रोहित व शिवशंकर हे साईड सुपरवायझर म्हणून काम करत होते. ट्रक चालक घटना स्थळावरून फरार झाला होता; अपघात एवढा भीषण होता की टेम्पोचा पुढचा भाग पूर्ण चेपला असून उसाचा ट्रक पलटी झाला होता यावेळी रस्त्यावर ऊस पसरल्याने या मार्गावरील दोन्हीकडील वाहतूक एक तास खोळंबळी होती. अधिक तपास गंगापूर पोलीस करीत आहे.

शहरात जाऊन येतो म्हणून सांगितले होते.

होळी निमित्ताने कंपनीचे काम बंद होते त्यामुळे हे चौघेजन औरंगाबाद शहरातून जाऊन येतो असे कंपनीत  सांगून कंपनीची गाडी घेऊन गेले होते; मात्र शहरात न जाता त्यांनी थेट शिर्डी गाठली परत येतांनी काळाने त्यांच्यावर घाला घातला.

दुसरा अपघात कार पुलाच्या खाली पलटी

या मार्गावर वाहतूक खोळंबळी असल्याने वैजापूरहुन नगरकडे जाणारी कार एम.एच.१४ जी.एस.२८१३ समोर उभ्या ट्रकला धडकली मात्र यात कोणतीही जीवितहानी झाली नाही यामुळे पुन्हा वाहतुकिला अडथळा येऊ नये म्हणून जेसीबीच्या सहाय्याने सदरील कार बाजूला घेत असतांना रस्त्याच्या कडेला पुलाच्या खाली पलटी झाली.

पंधरा दिवसांत सहा जनांचा बळी

वैजापूर गंगापूर मार्ग मृत्यूचा सापळा बनला आहे; नवीन झालेल्या या चौपदरी मार्गावर रहदारीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली असून गत पंधरा दिवसांत या मार्गावर सहा जणांचा अपघात बळी गेला आहे.

टॅग्स :Deathमृत्यूAurangabadऔरंगाबादAccidentअपघात