अभियंत्याचा कार्यालयातच धुडगूस
By Admin | Updated: August 4, 2014 00:48 IST2014-08-04T00:18:53+5:302014-08-04T00:48:57+5:30
माजलगाव : येथील वीज वितरण कार्यालयामध्ये कनिष्ठ अभियंत्याने धुडगूस घालत सुरक्षारक्षकाला बेदम मारहाण केली़ शिवाय संगणक व इतर साहित्याची तोडफोड केली़ ही घटना रविवारी घडली़
अभियंत्याचा कार्यालयातच धुडगूस
माजलगाव : येथील वीज वितरण कार्यालयामध्ये कनिष्ठ अभियंत्याने धुडगूस घालत सुरक्षारक्षकाला बेदम मारहाण केली़ शिवाय संगणक व इतर साहित्याची तोडफोड केली़ ही घटना रविवारी घडली़
प्रशांत उइके असे त्या अभियंत्याचे नाव आहे़ त्यांच्या विरुद्ध शहर ठाण्यात सुरक्षारक्षक श्रीकृष्ण बळीराम नाईकवाडे यांनी फिर्याद नोंदविली़ दुपारी चार वाजता नाईकवाडे कार्यालयात कर्तव्य बजावत होते़ यावेळी उइके तेथे आले़ त्यांनी कार्यालय उघड, असे सांगितले़ त्यानंतर तू चांगली ड्युटी निभावत नाहीस, असे म्हणत शिवीगाळ करुन मारहाण केली़
यावेळी संगणक, खुर्च्या, टेबल इत्यादी साहित्याचीही तोडफोड करण्यात आली़ शिवाय विद्युत पुरवठ्याच्या मुख्य मीटरची ही नासधूस केली़ त्यानंतर नाईकवाडे यांनी शहर ठाणे गाठले़ या घटनेने खळबळ उडाली आहे़ कनिष्ठ अभियंता उइके एवढे टोकाला का गेले ? याचे कोडे कायम आहे़ (वार्ताहर)
शहर अंधारात
मुख्य वीज पुरवठ्याचे मीटर तोडल्यामुळे पुरवठा ठप्प झाला आहे़ परिणामी शहरात अंधार पसरला़ शहराजवळील काही गावांनाही याची झळ पोहचली आहे़