शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या बारामतीतील प्रचाराच्या सांगता सभेत अचानक अजितदादांची एंट्री; नेमकं काय घडलं?
2
चेन्नई सुपर किंग्सने बदलले Point Table चे चित्र; दुसऱ्या फळीच्या गोलंदाजांना घेऊन १११५ दिवसांनी जिंकले
3
"एका पठ्ठ्याने अश्रू काढले, घ्या मी पण रडतो, मला मत द्या", अजित पवारांनी केली नक्कल
4
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
5
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
6
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
7
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
8
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
9
“राज ठाकरे ज्यांच्या प्रचारासाठी जातात तो उमेदवार पडतोच”; ठाकरे गटाचा खोचक टोला
10
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
11
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
12
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
13
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
14
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
15
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
16
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
17
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
18
PHOTOS : पती IPL मध्ये तर पत्नी निवडणुकीत 'बिझी', भाजपसाठी रिवाबा जडेजा 'मैदानात'!
19
६ धावांत ३ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
20
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!

यंदाही दिवाळीत ‘बोनस’ची धूम; नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात मिळणार रक्कम 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 23, 2020 6:42 PM

यावर्षी लॉकडाऊनमुळे उद्योग अडीच-तीन महिने बंद जरी असले, तरी त्यांना बोनस द्यावाच लागणार आहे.

ठळक मुद्देबाजारात होणार कोट्यवधींची उलाढालबोनसवर कोरोनाचा परिणाम नाही

- विजय सरवदे

औरंगाबाद : लॉकडाऊनमुळे देशभरातील उद्योगधंदे, बाजारपेठा तीन-चार महिने ठप्प होत्या. त्यामुळे यंदा कामगारांना बोनस मिळेल का, असा संभ्रम निर्माण झाला होता; पण घाबरून जाण्याचे कारण नाही. कायद्यानुसार बोनस द्यावाच लागतो. यंदाही तो वितरित केला जाणार आहे. यासंदर्भात उद्याेगांमध्ये हालचाली सुरू झाल्या असून, साधारणपणे  १० ते १२ नोव्हेंबरपर्यंत बोनसचा पैसा कामगारांच्या हातात येईल.

यंदा ‘बोनस’ची स्थिती काय राहील, यासंदर्भात ‘लोकमत’ने उद्योग संघटना व मोठ्या उद्योगांची भूमिका जाणून घेतली. तेव्हा बोनसबाबतच्या कायद्यानुसार मागील आर्थिक वर्षातील उलाढालीवर पुढील वर्षातील दिवाळीपूर्वी कामगारांना बोनसचा लाभ दिला जातो. त्यामुळे यावर्षी लॉकडाऊनमुळे उद्योग अडीच-तीन महिने बंद जरी असले, तरी त्यांना बोनस द्यावाच लागणार आहे. मात्र, मागील वर्षाच्या तुलनेत बोनसच्या रकमेचे प्रमाण कमी-अधिक राहू शकते. 

बजाज ऑटो कंपनीतील भारतीय कामगार सेनेचे नेते विलास जाधव म्हणाले की, बोनससंदर्भात व्यवस्थापनासोबत आमचे बोलणे चालू आहे. दिवाळीनिमित्त बोनस व पगार हा १ नोव्हेंबर रोजी करावा, अशी आमची मागणी आहे. गेल्या वर्षी बजाजच्या कामगारांना सरासरी २५ हजार रुपये बोनस मिळाला होता. याबाबत उद्या २३ नोव्हेंबर रोजी चित्र स्पष्ट होईल, असे जाधव यांनी सांगितले.‘व्हेरॉक’चे मनुष्यबळ विकास (एचआर हेड) विभागाचे व्यवस्थापक सतीश मांडे यांनी सांगितले की, कायद्यानुसार बोनस देणे बंधनकारक आहे. त्यानुसार आम्ही तो देणार आहोत. तो कधी द्यायचा, किती द्यायचा, यासंबंधी आताच जाहीरपणे सांगणे उचित होणार नाही. आमच्या कंपनीमध्ये कामगारांना सरसकट बोनसची रक्कम वितरित केली जाते. यासाठी आम्हाला संघटनेसोबत चर्चा करण्याची गरज नाही.  

बोनसवर कोरोनाचा परिणाम नाही‘सीआयआय’चे मराठवाडा अध्यक्ष मुकुंद कुलकर्णी यांनी सांगितले की, लॉकडाऊनमध्ये दोन-तीन महिने उद्योग बंद होते. सध्या नाजूक परिस्थितीतून उद्योग वाटचाल करीत आहेत. याचा परिणाम बोनसवर होईल, असा अंदाज लावणे चुकीचे राहील. उद्योगांंना नियमानुसार बोनस द्यावाच लागणार आहे. दोन प्रकारचे बोनस असतात. एक कायद्यानुसार दिला जाणारा व दुसरा उद्योगाला नफा अधिक झाल्यामुळे स्वेच्छेने दिला जाणारा. यावेळी स्वेच्छेने दिला जाणाऱ्या बोनसवर मात्र मर्यादा येतील. 

बोनस द्यावाच लागेलयासंदर्भात ‘मासिआ’चे अध्यक्ष अभय हंचनाळ म्हणाले, काहीही जरी झाले तरी उद्योगांना दिवाळीपूर्वी बोनस द्यावाच लागेल. काही कंपन्या ऑक्टोबर अखेरपर्यंत, तर काही १० नोव्हेंबरपर्यंत बोनसचे वितरण करतील. नियमानुसार मागच्या आर्थिक वर्षातील उलाढालीवर बोनसची रक्कम निश्चित केली जाते.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादfundsनिधीEmployeeकर्मचारीbusinessव्यवसाय