शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
2
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
3
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
4
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
5
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
6
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
7
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
8
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
9
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
10
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
11
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
12
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
13
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
14
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
15
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
16
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?
17
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
18
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
19
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
20
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले

ढोल-ताशे २५०० रु., फेटा १००, तर टोपी ३५ रुपये; उमेदवारांना खर्चाची मर्यादा ९५ लाख

By प्रशांत तेलवाडकर | Updated: April 10, 2024 14:20 IST

आता प्रचार आणि खर्च यांचा ताळमेळ कसा बसवायचा, असा प्रश्न उमेदवारांना पडला आहे.

छत्रपती संभाजीनगर : निवडणुकीत कोट्यवधींची उलाढाल होत असते, मात्र या खर्चाला लगाम घालण्यासाठी निवडणूक आयोगाने एक उमेदवार किती खर्च करू शकतो. यावर मर्यादा आणली आहे.लोकसभा निवडणुकीच्या काळात एकूण ९५ लाखांपर्यंत खर्चाची मर्यादा घालून देण्यात आल्याने, आता प्रचार आणि खर्च यांचा ताळमेळ कसा बसवायचा, असा प्रश्न उमेदवारांना पडला आहे. कारण, उमेदवारांना खर्चाचा तपशील आयोगाला द्यावा लागणार आहे.

निवडणूक आयोगाने ठरवून दिलेले दरखर्चाचा प्रकार            दरराइस प्लेट --- १०० रु.चहा--- ५ रु.पोहे---१० रु.उपमा---१० रु.शिरा--- १० रु.पाण्याची बाटली---१५ रु.पाण्याचा जार--- २० रु.जरीचा फेटा---१०० रु.टोपी--- ३५ रु.भोंगा--- ६०० रु.ढोल-ताशे--- २५०० रु. (चार व्यक्ती प्रतिदिन)असे ५१८ प्रकारचे दर निश्चित करण्यात आले आहेत.

कोणत्या बँकेत उघडावे लागेल खाते?कोणत्याही राष्ट्रीयीकृत बँकेत किंवा सहकारी बँकेत उमेदवार खाते उघडू शकतो. विशेष म्हणजे उमेदवारी अर्ज भरण्याच्या आधीच खाते बँकेत उघडावे लागेल. कारण, उमेदवारी अर्ज भरताना खाते क्रमांकाचा उल्लेख करावा लागणार आहे.

दैनंदिन खर्चाची नोंद करणे अनिवार्यउमेदवारी अर्ज भरताना उमेदवारांना खर्चाच्या नोंदणीसाठी रिटर्निंग ऑफिसर रजिस्टर दिले जाणार आहे. त्या रजिस्टरमध्ये उमेदवाराला निवडणूक काळात झालेल्या दैनंदिन खर्चाच्या नोंदी ठेवाव्या लागणार आहेत. या नोंदी ठेवणे निवडणूक आयोगाने अनिवार्य केले आहे.

दरपत्रकाचे पालन करावे लागणारलोकसभा निवडणुकीत उमेदवारांनी किती खर्च करायचा, याची मर्यादा घालण्यात आली आहे. तसेच प्रचारात लागणाऱ्या कोणत्या उत्पादनावर किती खर्च करायचा, याचे दर निश्चिती समितीने ठरवले आहेत. उमेदवारांना या दरपत्रकाचे पालन करावे लागणार आहे.- देवेंद्र कटके, निवडणूक उपजिल्हाधिकारी

टॅग्स :Aurangabadऔरंगाबादlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४