धारूर, गेवराई तापीने फणफणले

By Admin | Updated: September 19, 2014 01:01 IST2014-09-19T00:28:15+5:302014-09-19T01:01:21+5:30

धारूर/गेवराई: वातावरणील होणारा बदल आणि परीसरात साचलेले घाणीचे साम्राज्य यामुळे दिवसेंदिवस साथीच्या रोग वाढू लागले आहेत.

Dharur, Gevarai Tapi Phanfanale | धारूर, गेवराई तापीने फणफणले

धारूर, गेवराई तापीने फणफणले


धारूर/गेवराई: वातावरणील होणारा बदल आणि परीसरात साचलेले घाणीचे साम्राज्य यामुळे दिवसेंदिवस साथीच्या रोग वाढू लागले आहेत. सध्या धारूर व गेवराई तालुक्यात मोठ्या प्रमाणात रूग्ण आढळून येत असून आरोग्य विभागाचे याकडे साफ दुर्लक्ष होत आहे.
गेवराई, धारूर तालुक्यात मागील आठ दिवसापासून ताप, सर्दी, खोकला आदी संसर्गजन्य रोग वाढले आहेत. यामुळे खाजगी व सरकारी रूग्णालयात रूग्णांची गर्दी होऊ लागली आहे. गेवराई तालुक्यातील तलवाडा, राहेरी, पांढरवाडी, मन्यारवाडी, धोंडराई, कोल्हेर, जातेगाव, मादळमोही, पाचेगाव, चकलंबा यासह तालुक्यातील अनेक गावे तापीने फनफनले असून लहान मुलांपासून ते वृद्धांपर्यंत या तापीचे रूग्न शहरापासून ते ग्रामीण भागापर्यंंत आढळून येत आहेत.
यातच आरोग्य केंद्र व प्राथमिक आरोग्य केंद्रात डॉक्टर वेळेवर हजर रहात नसल्याने रूग्णांना खासगी रूग्णालयांचा आधार घ्यावा लागत आहे. यामुळे सर्वसामान्य नागरीकांना आर्थिक भूर्दंड सहन करावा लागत आहे. तर दुसरीकडे मागील आठ दिवसापासून तालूका तापीने फनफनला असून आरोग्य विभागाचे याकडे मात्र साफ दुर्लक्ष होत असल्याचा आरोप होत आहे.
या दोन्ही तालुक्यातील साथींच्या रोगांवर आरोग्य विभागाकडून कसलीही उपाय योजना होत नसल्याचा आरोप विक्रम लाढ, अल्ताफ कुरेशी यांनी केला आहे.
लहान मुलांची संख्या अधिक
तालुक्यात सध्या साथीच्या आजारांनी थैमान घातले असून यामुळे रूग्ण त्रस्त झाले आहेत. यात जास्तीत जास्त रूग्ण हे लहान मुले असल्याचे दिसून येत आहे. यावर उपाययोजना करण्यात मात्र आरोग्य विभागाला अपयश येत आहे. त्यामुळे सर्वसामान्यांमधून आरोग्य विभागाबद्दल संतप्त प्रतिक्रिया ऐकावयास मिळत आहेत.
धुर फवारण्याची मागणी
शहरात व ग्रामीण भागात घाणीचे साम्राज्यामुळे डासांचा उपद्रव वाढला आहे. यामुळे साथीचे रोग नागरीकांन जडू लागले आहेत. या कारणास्तव धुर, बीएसी पावडर फवारण्याची मागणी होत आहे.
याबाबत गेवराईचे तालुका वैद्यकीय अधिकारी एल.आर.तांदळे यांनी सांगितले की, ज्या गावांत तापीेच रूग्ण आढळून आले आहेत, त्यांची पाहणी करण्यात येईल.
संबंधीत आरोग्य कर्मचाऱ्यांना गावात हजर राहून औषधी तसेच रक्ताचे नमुने तपासण्यात येणार आहेत. (वार्ताहर)

Web Title: Dharur, Gevarai Tapi Phanfanale

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.