धारुर बीडीओचे पद रिक्त

By Admin | Updated: July 9, 2014 00:26 IST2014-07-08T22:37:17+5:302014-07-09T00:26:32+5:30

धारुर: धारुर पंचायत समितीचे प्रमुख असणारे गट विकास अधिकारी पद गेल्या एक वर्षापासून रिक्त आहे़

Dharur BDO post vacant | धारुर बीडीओचे पद रिक्त

धारुर बीडीओचे पद रिक्त

धारुर: धारुर पंचायत समितीचे प्रमुख असणारे गट विकास अधिकारी पद गेल्या एक वर्षापासून रिक्त असून या पदाचा प्रभारी कारभार पाहणारे अधिकारी तीन तीन पदे सांभाळत असल्याने आठवडा-आठवडा कायाृलयाकडे फिरकत नाहीत़ त्यामुळे येथील पंचायत समितीचे सर्व कामे रखडली असून पदाधिकाऱ्यांचे नियंत्रण नसल्याने आपले प्रश्न कोणाकडे मांडावे, असा प्रश्न सर्वसामान्यांना पडत आहे़
धारुर येथील पं़ स़ चे गट विकास अधिकारी निलंबित झाल्याने हे पद एक वर्षापूर्वी रिक्त झाले होते़ हे पद रिक्त झाल्याने याचा पदभार केजचे सहायक गट विकास अधिकारी संजय केंद्रे यांच्याकडे प्रभारी म्हणून देण्यात आला़ त्यांच्याकडे परळी पं़ स़ चा गट विकास अधिकारी पदाचा कारभार आहे़ ते सध्या तीन तीन पदाचा कारभार पाहतात़ त्यामुळे आठ आठ दिवस ते कार्यालयात ये तनाहीत़ क्षुल्लक कामासाठी नागरिकांना चकरा माराव्या लागतात़ गट विकास अधिकारी कार्यालयात येत नसल्यामुळे कार्यालयात दिवसा सुनसान शांतता दिसते़
विभागात कर्मचारीही आढळून येत नाहीत़ तीन तीन पदााच कारभार सांभाळत असल्याने येथील कारभार पाहण्याीच पध्दत म्हणजे उंटावरुन शेळ्या राखण्याचा प्रकार असून मर्जीतील काही कर्मचाऱ्यांना जवळ करुन ते येथील कारभार हाकत आहेत़ त्यामुळे नागरिकांची कुठलीच कामे वेळेवर होत नाहीत़
नागरिक यामुळे वैतागून गेले आहेत, असा आरोप सामाजिक कार्यकर्ते बंडोबा सावंत यांनी केला असून येथे पदाचा गट विकास अधिकारी तात्काळ नियुक्त करावा, येथील गैरसोय दूर करावी, अशी मागणी जि़ प़ मनसेचे तालुकाध्यक्ष विठ्ठलराव शिनगारे यांनी केली आहे़
या परिस्थितीकडे येथील पदाधिकाऱ्यांचे दुर्लक्ष असून हे अधिकारी पदाधिकाऱ्यांची कामे वेळेवर करुन त्यांना मोकळे करतात़ त्यामुळे त्यांचे याकडे दुर्लक्ष आहे़ त्यामुळे एक वर्षात वित्त आयोगाच्या निधीचा, मुद्रांक शुल्क निधी म्हणून झालेल्या कामाची चौकशी होणे आवश्यक आहे़ येथील पं़ स़ चा कारभार सध्या राम भरोसे असल्याने सर्वसामान्य नागरिक वैतागून गेले आहेत़ (वार्ताहर)
प्रभारी अधिकाऱ्यावर तीन पदाचा कारभार
वर्षभरापासून पद रिक्त असल्याने खोळंबत आहेत काम
प्रभारी अधिकाऱ्यावर तीन पदाचा कारभार
प्रभारी अधिकाऱ्याचेही कार्यालयाकडे दुर्लक्ष
एका कामासाठी नागरिकांना माराव्या लागत आहेत अनेकवेळा चकरा
रिक्त पद भरण्याची मागणी

Web Title: Dharur BDO post vacant

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.