धारुरात गाळ उपशाची चळवळ; वाढणार साठवण क्षमता
By Admin | Updated: May 16, 2016 23:32 IST2016-05-16T23:28:33+5:302016-05-16T23:32:20+5:30
अनिल महाजन ल्ल धारूर दुष्काळी स्थितीत येथे लोकसहभागातून गाळ उपशाची कामे मोठ्या वेगाने सुरू आहेत. त्यामुळे शहर व परिसरातील ऐतिहासिक तलावातील पाण्याची साठवण क्षमता वाढणार आहे.

धारुरात गाळ उपशाची चळवळ; वाढणार साठवण क्षमता
अनिल महाजन ल्ल धारूर
दुष्काळी स्थितीत येथे लोकसहभागातून गाळ उपशाची कामे मोठ्या वेगाने सुरू आहेत. त्यामुळे शहर व परिसरातील ऐतिहासिक तलावातील पाण्याची साठवण क्षमता वाढणार आहे. गाळ उपशाला लोकचळवळीचे स्वरूप प्राप्त झाल्याचे चित्र आहे.
दसरा मैदानाजवळील तलावातील गाळ शेतकऱ्यांनी स्वत: उपसून आपल्या शेतात टाकला.
‘किल्लेधारूर युथ क्लब’ने पुढाकार घेऊन सुरू केलेल्या कामाला झोपडपट्टी, वैद्यनाथ नगर भागांतील नागरिकांनीही हातभार लावला. त्यामुळे अनेक वर्षांपासून साचलेला गाळ बाहेर काढता आला.
बाजारतळाजवळील कासार तलावाचे गाळ काढण्याचे काम मग्रारोहयोतून एका महिन्यात करण्यात आले. या कामावर रोज ५०० वर मजूर राबत होते.