धनगर आरक्षण समितीचा मोर्चा
By Admin | Updated: August 9, 2014 00:32 IST2014-08-08T23:06:58+5:302014-08-09T00:32:50+5:30
अंबाजोगाई : धनगर समाजाचा समावेश एस. टी. प्रवर्गात करून या प्रवर्गाच्या सवलती धनगर समाजाला द्याव्यात. या मागणीसाठी अंबाजोगाईत

धनगर आरक्षण समितीचा मोर्चा
अंबाजोगाई : धनगर समाजाचा समावेश एस. टी. प्रवर्गात करून या प्रवर्गाच्या सवलती धनगर समाजाला द्याव्यात. या मागणीसाठी अंबाजोगाईत धनगर आरक्षण कृती समितीच्या वतीने उपजिल्हाधिकारी कार्यालयावर शुक्रवारी सकाळी भव्य मोर्चा काढण्यात आला होता. पारंपारिक वाद्यासह निघालेल्या या मोर्चात महिला व विद्यार्थ्यांचा मोठा सहभाग होता. मोर्चेकऱ्यांच्या जोरदार घोषणाबाजीने अंबाजोगाई शहर दणाणून गेले.
भारतीय राज्य घटनेत ‘धनगड’ या नावाने अनुसूचित जमातीच्या या यादीत ३६ व्या क्रमाकांवर नोंद असलेल्या धनगर समाजाला एस.टी. प्रवर्गाच्या सवलतीचा लाभ मिळावा. स्वातंत्र्यानंतर ६७ वर्षे लोटले तरी या चुकीची दुरूस्ती अद्याप झाली नाही. परिणामी याचा मोठा फटका धनगर समाजाला सहन करावा लागत आहे. या संदर्भात केंद्र व राज्य सरकारकडे सातत्याने पाठपुरावा करूनही प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे धनगर समाज उपेक्षित राहिला आहे.
या मागणीकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी शुक्रवारी सकाळी भव्य मोर्चा येथील डॉ. आंबेडकर चौकातून निघाला. पारंपरिक वाद्ये, जोरदार घोषणाबाजी,यांच्यासह मोर्चात धनगर समाजाच्या कार्यकर्त्यांसह महिला व विद्यार्थ्यांचा मोठ्या संख्येने सहभाग होता. हा मोर्चा बसस्थानक, शिवाजी चौक मार्गे उपजिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. य्
यावेळी विविध मागण्यांचे निवेदन उपजिल्हाधिकारी मंदार वैद्य यांना देण्यात आले. यावेळी झालेल्या सभेत मान्यवरांची भाषणे झाली.
या मोर्चात प्रा. महेश चौरे, वसंत शिंपले, नितीन काळे, सुखदेव देवकते, प्रा. विष्णु कावळे, भाऊराव गवळी, अशोक हेडे, जयराम लगसकर यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने या मोर्चात सहभागी झाले होते. आंदोलनाने शहर दणाणून गेले़ महिलांचाही मोठा सहभाग होता़(वार्ताहर)