धनगर समाजाचा जोरदार चक्काजाम
By Admin | Updated: August 15, 2014 01:34 IST2014-08-15T01:10:04+5:302014-08-15T01:34:36+5:30
बदनापूर : महाराष्ट्र राज्य धनगर समाज आरक्षण कृती समितीच्या वतीने येथील जालना-औरंगाबाद महामार्गावर रास्तारोको करून आरक्षण देण्याची मागणी केली.

धनगर समाजाचा जोरदार चक्काजाम
बदनापूर : महाराष्ट्र राज्य धनगर समाज आरक्षण कृती समितीच्या वतीने येथील जालना-औरंगाबाद महामार्गावर रास्तारोको करून आरक्षण देण्याची मागणी केली.
धनगर समाजाला गेल्या ६४ वर्षांपासून एसटी आरक्षणापासून वंचित ठेवण्यात आले आहे. या समाजाला त्वरित अनुसूचित जमातीमध्ये आरक्षण द्यावे, या प्रमुख मागणीसाठी १४ आॅगस्ट रोजी जालना-औरंगाबाद महामार्गावर रास्ता रोको आंदोलन केले. यावेळी घोषणाबाजी करून राज्यातील आघाडी सरकारविरोधात रोष व्यक्त करण्यात आला. शासनाने जर लवकर आरक्षण दिले नाही, तर या समाजाच्या वतीने यापेक्षाही तीव्र आंदोलन करू, असा इशारा यावेळी देण्यात आला. यावेळी अॅड. सुनील कुंडकर, बजरंग वैद्य, बाळासाहेब वैद्य, गणेश कोल्हे, रामनाथ वैद्य,डॉ कुंडकर, रमेश चोरमारे, मच्छींद्र होळकर, नारायण वैद्य, रघुनाथ होळकर, जनार्दन सोरमारे, प्रभाकर जोशी, उध्दव जोशी,विष्णु धनकुरे ,भारत भोजने, गंगाधर गायके, भाऊसाहेब वैद्य, गणेश शिंगाडे, रामेश्वर कोल्हे, गजानन चांगुलपाये, सत्यनारायण कोल्हे, लव्हाळे गुरूजी,विमलताई कोल्हे, शांताबाई काळे, रूखमणबाई रर्इंद, मिनाबाई सातपुते,लक्ष्मण भोजने,बाबा टोगे यांच्यासह तालुक्यातून शेकडो समाजबांधव उपस्थित होते. (वार्ताहर)
तीर्थपुरी : घनसावंगी तालुक्यातील तीर्थपुरी येथे १४ आॅगस्ट रोजी धनगर समाजाच्या वतीने रास्तारोको आंदोलन करण्यात आले. तीर्थपुरी अंबड रस्त्यावरील डाव्या कालव्याच्या पुलावर हे आंदोलन करण्यात आले. आंदोलनकर्त्यांनी विविध घोषणा देत रास्तारोको आंदोलन केले. या आंदोलनात सुधाकर मापारे, अॅड. कैलास जारे, बालासाहेब केसकर, प्रल्हाद भोजने, प्रदीप मापारे, आसाराम बोबडे, गणेश पघळ, श्रीकृष्ण बोबडे, सचिन चिमणे, शैलेंद्र पवार, रमेश बोबडे, शाहुराव गायकवाड, श्रीरंग डोईफोडे, बाळू म्हस्के, दीपक गायकवाड, परमेश्वर मापारे, भारत पांढरे, नवनाथ पांढरे, तुकाराम भोजने, डॉ. प्रवीण कडुकर, विजय पांढरे, राजू मापारे, दत्ता मापारे, दीपक मस्के, मुगाजी मापारे, रामा डोईफोडे आदींनी सहभाग घेतला होता.
जामखेड : आरक्षणाच्या मागणीसाठी औरंगाबाद - बीड महामार्गावर परिसरातील धनगर समाज बांधवांनी गुरुवारी चक्काजाम आंदोलन केले. जामखेडसह परिसरातील गावांतील समाजबांधव या आंदोलनात सहभागी झाले होते. हे आंदोलन जवळपास २ ते ३ तास सुरू होते. यावेळी रस्त्याच्या दुतर्फा वाहतूक थांबली होती. महसूल प्रशासनाच्या प्रतिनिधींच्या वतीने तलाठी एस.एस. बोटुळे यांना निवदेन देण्यात आले.
४टेंभूर्णी : जाफराबाद तालुक्यातील टेंभूर्णी येथे धनगर समाजाच्या वतीने अनुसूचित जातीत समावेश करून त्याची अंमलबजावणी शासनाने करावी, यासाठी गुरुवारी रास्तारोको आंदोलन केले. टेंभूर्णी येथील शिवाजीचौकात हे आंदोलन सकाळी ११ वाजता करण्यात आले. आपल्या विविध मागण्यांचे निवदेन तहसीलदार एल.डी. सोनुने यांना देण्यात आले. यावेळी दिनकरराव देशमुख, सुरेश दिवटे, सुरेश देशमुख, दामोधर वैद्य, कैलास दिवटे, किसन जोशी, दीपक बोराडे, रंगनाथ जोशी, फकीरबा पाचे, भावराव देशमुख, प्रकाश देशमुख, बालाजी जोशी, रामा गुरव, सचिन देशमुख, दत्ता सोनसाळे, सुनील जोशी, अनिल शेजूळ, गणेश देशमुख, शिवाजी बोऱ्हाडे आदींसह धनगर समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
४वाटूरफाटा : परतूर तालुक्यातील वाटूरफाटा येथे आपल्या विविध मागण्यांसाठी धनगर समाजाच्या वतीने गुरुवारी रास्तारोको आंदोलन केले. जालना-मंठा महामार्गावर सुमारे एक तास चाललेल्या आंदोलनामुळे मोठ्या प्रमाणावर सर्वदूर वाहनांच्या रांगा होत्या. हे आंदोलन धनगर समाज आरक्षण कृती समिती परतूरच्या नेतृत्वाखाली करण्यात आले. आंदोलनात भगवान पाटोळे, शिवाजी तरोटे, दत्ता कोल्हे, नामदेव गोरे, कैलास मुळे, बाबासाहेब गायकवाड, शिवाजी गोरे, अंबादास कातकडके, लक्ष्मण घोंगडे आदींसह समाजबांधव मोठ्या संख्येने सहभागी झाला होता.