धनगर समाजाचा जोरदार मोर्चा
By Admin | Updated: August 9, 2014 00:26 IST2014-08-08T23:57:29+5:302014-08-09T00:26:22+5:30
धनगर समाज आरक्षण कृृती समितीच्या वतीने शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर महामोर्चा काढण्यात आला.

धनगर समाजाचा जोरदार मोर्चा
जालना: धनगर समाजाचा अनुसूचित जमातीत समावेश करावा त्याद्वारे आरक्षणाची अंमलबजावणी करण्यात यावी या मागणीसाठी धनगर समाज आरक्षण कृृती समितीच्या वतीने शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर महामोर्चा काढण्यात आला.
सकाळी ११ वाजता गांधी चमन भागातून हा मोर्चा निघाला. ‘यळकोट यळकोट जय मल्हार, उठ धनगरा जागा हो, आरक्षणाचा धागा हो’ अशा गणगनभेदी घोषनांनी शहर दणाणले.
एका शिष्टमंडळाने आपल्या मागणीचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना दिले. त्यानंतर ठिकाणी मोर्चाचे रूपांतर सभेत झाले. धनगर समाजास घटनेनेच अनुसूचित जमातीचे आरक्षण दिलेले आहे. मात्र केवळ धनगर आणि धनगड या र आणि ड च्या घोळामुळे मागील ६७ वर्षापासून समाज अनुसूचित जमातीच्या सवलतीपासून वंचित मत व्यक्त करण्यात आले.
घटनेने दिलेल्या अधिकारा प्रमाणे समाजास अनुसूचित जमातीच्या आरक्षणाची तात्काळ अंमलबजावणी करावी, राज्य शासनाने या बाबत आपला अहवाल केंद्र सरकारला पाठवावा अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली आहे. आंदोलनास शिवसेना, भाजप, मनसे, भारीप बहुजन महासंघ आदी विविध राजकीय व सामाजिक संघटनांनी पाठिंबर दिला.
मोर्चात कृतिसमितीचे अध्यक्ष अॅड. अशोक तारडे, डॉ.एल. डी. भोजने, प्रकाश इंगळे, अॅड. सुरेश देशमुख, नारायण चाळगे, दिनकर देशमुख, सुभाष देंडगे, प्रा. माळशिखरे, देविदास कटके, अॅड. झेड. बी. मिसाळ, पांडुरंग कोल्हे, डॉ. बळीराम गायकवाड, शिवप्रकाश चितळकर, ओमप्रकाश चितळकर, शांतीलाल बनसोडे, राम लांडे, कैलास खडेकर, गजानन जोशी, रामेश्वर मैंद, दामु जोशी, ज्ञानेश्वर हांडगे, निवृत्ती सातपूते, संतोष सोलाट, किसन मैद, सुभाष सोलाट, रामदास जोशी, बाबासाहेब आटोळे, पांडुरंग कावळे, दिवटे, शोभाताई मतकर, अॅड. सुरेश मतकर, शोभा मतकर, राजेंद्र वैद्य, सुरेश दिवटे, रामेश्वर जऱ्हाड, संतोष खडेकर, गजानन आधे, ऋषि आधे, संतोष काळे, आसाराम मिसाळ, अशोक विर, महेंद्र भाकरे, रामेश्वर आधे, गणेश रौदाळे, दत्ता चोरमारे, कैलास चोरमारे, रंगनाथ देवकाते, बाळासाहेब हाके, कैलास कोळेकर, सर्जेराव सरोदे, विशाल पांढरे, मापारी, अॅड. वैभव खटके, अॅड. भगवान वीर, निलेश रौदाळे, अशोक रौदाळे, गणेश रौदाळे, किसन वीर, चत्रभूज शेळके, रोहिदास शेळके, मच्छिद्र वीर, रावन दहेकर, दत्तात्र्य रौदाळे, दत्तात्रय डोळझाके, यांच्यासह सुमारे २५ ते ३० हजार समाज बांधव सहभागी झाले होते. मोर्चेकऱ्यांच्या वतीने निवेदन सादर करण्यात आले. (प्रतिनिधी)