आरक्षणासाठी धनगर समाजाचा मोर्चा
By Admin | Updated: August 13, 2014 00:23 IST2014-08-13T00:01:02+5:302014-08-13T00:23:22+5:30
परभणी: धनगर समाजास अनुसूचित जमातीमध्ये समाविष्ट करून तशा सवलती देण्यात याव्यात, या मागणीसाठी धनगर समाजाच्या वतीने मंगळवारी परभणी येथील जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला.

आरक्षणासाठी धनगर समाजाचा मोर्चा
परभणी: धनगर समाजास अनुसूचित जमातीमध्ये समाविष्ट करून तशा सवलती देण्यात याव्यात, या मागणीसाठी धनगर समाजाच्या वतीने मंगळवारी परभणी येथील जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला.
धनगर समाजाचा अनुसूचित जमातीमध्ये समावेश करून या समाजाला तशा सवलती तातडीने लागू कराव्यात, या मागणीसाठी धनगर समाजाच्या वतीने राज्यभर आंदोलन करण्यात येत आहे. याच अनुषंगाने मंगळवारी धनगर समाजाच्या वतीने मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. सकाळी मोर्चा खंडोबा बाजार येथून दुपारी १२ च्या सुमारास सुरू झाला. त्यानंतर हा मोर्चा शनिवार बाजार, शिवाजी चौक, गांधीपार्क, नारायणचाळ कॉर्नर मार्गे शिवाजी पुतळा परिसरात दाखल झाला. त्यानंतर या मोर्चाचे सभेत रुपांतर झाले.
यावेळी विविध मान्यवरांनी आरक्षण मिळेपर्यंत लढा चालूच ठेवण्याचा निर्धार केला. यावेळी राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर, हनुमंत सूळ, आ. रामराव वडकुते, रामचंद्र कोल्हे, प्राचार्य शिवाजी दळणर, हरिभाऊ शेळके, मारोती बनसोडे, विठ्ठल रबदडे, विलास लुबाळे, बबन मुळे, सुरेश भूमरे, पांडुरंग बनसोडे, विठ्ठल वडकुते, सुरेश बंडगर, सावजी इसगुंडे यांच्यासह समाजातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. (प्रतिनिधी)