धनगर समाजाचे चक्काजाम आंदोलन

By Admin | Updated: August 15, 2014 00:03 IST2014-08-14T23:28:05+5:302014-08-15T00:03:17+5:30

परभणी : धनगर समाजाचा अनूसुचित जमातीमध्ये समावेश करून तशा सवलती देण्यात याव्यात, या मागणीसाठी गंगाखेड, जिंतूर, राणीसावरगाव, झरी, पेडगाव, टाकळी कुंभकर्ण आदी ठिकाणी चक्काबंद आंदोलन करण्यात आले.

Dhangar community movement movement | धनगर समाजाचे चक्काजाम आंदोलन

धनगर समाजाचे चक्काजाम आंदोलन

परभणी : धनगर समाजाचा अनूसुचित जमातीमध्ये समावेश करून तशा सवलती देण्यात याव्यात, या मागणीसाठी गंगाखेड, जिंतूर, राणीसावरगाव, झरी, पेडगाव, टाकळी कुंभकर्ण आदी ठिकाणी चक्काबंद आंदोलन करण्यात आले. तसेच चार ठिकाणी एसटी बसवर दगडफेक करण्यात आली.
परभणी तालुक्यातील झरी, पेडगाव, टाकळी कुंभकर्ण, पोखर्णी आदी ठिकाणी चक्काजाम आंदोलन झाले. परभणी शहरातील खानापूर फाटा येथे यवतमाळ-बीड या बसवर दगडफेक झाली. पाठीमागून दुचाकीवर आलेल्या दोन युवकांनी ही दगडफेक केली. त्यात बसच्या काचा फुटून नुकसान झाले. तसेच शहरातील वसमतरोडवर आसोला पाटीजवळ दुपारी अडीच्या सुमारास निजामाबाद-औरंगाबाद (एम.एच.२०-बी. एल. २२८८) या एसटी बसवर दगडफेक करण्यात आली. त्यामध्ये बसच्या काचा फुटल्या. या शिवाय आसोला पाटी शिवारातच दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास (एम. एच. १४ बी. टी. १३८२) सोलापूर - हिंगोली या बसवर दगडफेक झाली. या प्रकरणी ताडकळस पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे. उपविभागीय पोलिस अधिकारी लता फड यांनी घटनास्थळाला भेट दिली. सहाय्यक पोलिस निरीक्षक नाचन तपास करीत आहेत.
गंगाखेड : गंगाखेड येथेही धनगर समाजबांधवांच्या वतीने चक्काजाम आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाचे नेतृत्व भाजपाचे जिल्हाध्यक्ष विठ्ठलराव रबदडे यांनी केले. रामचंद्र्र पोले, सुरेश बंडगर, लिंबाजी देवकते, प्रल्हाद शिंदे, नारायण घनवटे, उत्तमराव पोले, बालासाहेब नेमाने, गोविंद कचाले, अविनाश बरवे, भाऊसाहेब कुकडे, बालाजी टेकाळे, जितेश गोरे, ब्रिजेश शिंदे यांच्यासह आदींचा समावेश होता.
जिंतूर : शहरातील आण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याजवळ दुपारी १२ वाजता रास्ता रोको करण्यात आला. या संदर्भातील निवेदन तहसीलदार राम बोरगावकर यांना देण्यात आले. रास्ता रोकोमध्ये सुधाकर कुकडे, पुंजारे, आनंदराव कोरडे, रामराव हुलगुंडे, कुबेर हुलगुंडे, दीपक शेंद्रे, अर्जून वजीर, तुळशीराम कानडे, सटवाराव चिलगर, ज्ञानदेव नरुटे, मनोज शिंपले, डॉ. देवकते, सुगाजी गरगडे, अ‍ॅड. बनसोडे आदींचा सहभाग होता. (प्रतिनिधी)

Web Title: Dhangar community movement movement

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.