धनगर समाजाचे आंदोलन सुरूच
By Admin | Updated: August 15, 2014 01:37 IST2014-08-15T01:30:20+5:302014-08-15T01:37:02+5:30
उस्मानाबाद : राज्य शासनाने मान्य केलेली तिसरी सूची मान्य नसल्याचे सांगत धनगर समाजाच्या वतीने आरक्षणाच्या मागणीसाठी गुरूवारी ठिकठिकाणी

धनगर समाजाचे आंदोलन सुरूच
उस्मानाबाद : राज्य शासनाने मान्य केलेली तिसरी सूची मान्य नसल्याचे सांगत धनगर समाजाच्या वतीने आरक्षणाच्या मागणीसाठी गुरूवारी ठिकठिकाणी रास्तारोको, चक्काजाम आंदोलन केले़ या आंदोलनामुळे वाहतूक काही काळ व्यवस्था पूर्णत: कोलमडली होती़
उस्मानाबाद येथील धनगर समाज एसटी आरक्षण कृती समितीच्या वतीने आयुर्वेदिक महाविद्यालयासमोरील आहिल्यादेवी होळकर चौकात रास्तारोको आंदोलन करण्यात आले़ यावेळी डॉग़ोविंद कोकाटे, दत्ता बंडगर, इंद्रजित देवकते, राजाभाऊ वैद्य, भारत डोलारे, अॅडख़ंडेराव चौरे, संभाजी सगर, राजाभाऊ सोनटक्के, आश्रुबा कोळेकर, डिगंबर मैंदाड, बाळासाहेब खांडेकर, नंदू गावडे, बजरंग पाटील, गणेश एडके, बालाजी पांढरे, बालाजी काकडे, राहुल शिंदे, अशोक देवकते आदी सहभागी झाले होते़
राज्य शासनाने तिसऱ्या सूचीमध्ये धनगर समाजास आरक्षण मिळण्याबाबत केंद्राकडे प्रस्ताव पाठविण्याची घोषणा केली होती़ या निर्णयाविरोधात धनगर समाजाने परंडा येथील डॉ़ बाबासाहेब आंबेडकर चौकातील परंडा-कुर्डूवाडी मार्गावर दुपारी रास्तारोको आंदोलन केले़ यावेळी जयदेव गोफणे, बप्पाजी कराळे, दादासाहेब घुले, बाबासाहेब नरूटे, राजाभाऊ पाडळे, सुरेश जकवाले, परेश कोयले, श्रीराम नरूरे, प्रविण जकवाले, नरहरी जकवाले यांच्यासह समाजबांधव उपस्थित होते़ नायब तहसीलदार पांडळे यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले़
तुळजापूर-सोलापूर मार्गावर गोंधळवाडी पाटीवर राजाभाऊ मोटे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन केले़ यात गोंधळवाडी, यमगरवाडी, कोरेवाडी, सावरगाव, काटी, केमवाडी, वडगाव काटी येथील समाजबांधव सहभागी झाले होते़ आंदोलनात राजाभाऊ मोटे, बिरूदेव लोकरे, शेषेराव मोटे, गणेश सातपुते, दयानंद पाटील, घुलोबा मोटे, भुजंग यमगर, अतुल यमगर, अनिल पाटील, रघुनाथ भिसे, सरपंच अमृता मोटे, पोपट मोटे, संजय मोटे, देविदास पाटील, सुरेश कोकरे, सुब्राव मोटे आदी सहभागी होते़ लोहारा येथील शिवाजी चौकात झालेल्या चक्काजाम आंदोलनात उमाकांत लांडगे, डॉ़ हेमंत श्रीगिरे, पंडीत बारगळ, अॅड़सत्यवान अडसुळे, डॉ़ घायाळ, डॉ़ शिंदे, माणिकराव तिगाडे, रघूवीर घोडके, अतुल सरवडे, प्रशांत आडसुळे आदी उपस्थित होते़ (वार्ताहर)