तुळजापुरात धनगर समाजाचा मोर्चा
By Admin | Updated: July 16, 2014 01:25 IST2014-07-16T00:28:09+5:302014-07-16T01:25:55+5:30
तुळजापूर : धनगर समाजाचा अनुसूचित जमात प्रवर्गात समावेश करावा या प्रमुख मागणीसाठी मंगळवारी १५ रोजी १२ वाजता तुळजापूर येथील शिवाजी चौकातून मोर्चा काढण्यात आला.

तुळजापुरात धनगर समाजाचा मोर्चा
तुळजापूर : धनगर समाजाचा अनुसूचित जमात प्रवर्गात समावेश करावा या प्रमुख मागणीसाठी मंगळवारी १५ रोजी १२ वाजता तुळजापूर येथील शिवाजी चौकातून मोर्चा काढण्यात आला.
मोर्चाला शिवाजी चौकातून निघाल्यानंतर बसस्थानक चौक, भवानी रोड, आर्य चौक, कमानवेस मार्गे तहसील कार्यालयावर धडकला. यावेळी राजेंद्र शेंडगे,गोविंद कोकाटे, महानंदा पैलवान, दत्ता बंडगर, गणेश सोनटक्के यांनी समाजाच्या व्यथा मांडल्या. धनगर समाजाच्या आर्थिक प्रगतीसाठी व उन्नतीसाठी या समाजाचा अनुसूचित जमात प्रवर्गात समावेश झाला पाहिजे, अशी मागणी करण्यात आली. सदरील मागणी मान्य न झाल्यास याहीपेक्षा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही यावेळी नायब तहसीलदार गणपत वाघे यांना दिलेल्या निवेदनात देण्यात आला. त्यानंतर मोर्चाचे विसर्जन झाले. यावेळी धनगर समाजातील महिला व पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते.
लिंगायत समाजबांधवही रस्त्यावर
तुळजापूर : लिंगायत संघर्ष समिती तुळजापूर यांच्या वतीने सरसकट आरक्षण मिळाले पाहिजे, या मागणीसाठी मंगळवारी सकाळी ११ वाजता मोर्चा काढला. मागणीचे निवेदन तहसीलदार काशीनाथ पाटील यांना देण्यात आले. यावेळी शंकर कोरे, गुरुनाथ बडुरे, भारत कोप्पा, विश्वनाथ शेटे, नागेश कोल्हे, बसप्पा मस्के, विजय तोडकरी, वैशाली धरणे, अस्मिता शेटे, दीपाताई मस्के, निर्मला कोरे, अरुण तडमणे आदींसह समाज बांधव उपस्थित होते.