धनगर समाजाचा मोर्चा

By Admin | Updated: July 31, 2014 01:23 IST2014-07-31T00:55:45+5:302014-07-31T01:23:40+5:30

हिंगोली : अनुसूचित जमातीत समावेश करण्याच्या मागणीसाठी धनगर समाजाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर सर्वपक्षीय मोर्चा काढण्यात आला.

Dhangar community front | धनगर समाजाचा मोर्चा

धनगर समाजाचा मोर्चा

हिंगोली : अनुसूचित जमातीत समावेश करण्याच्या मागणीसाठी धनगर समाजाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर सर्वपक्षीय मोर्चा काढण्यात आला.
अहिल्यादेवी होळकर चौकातून या मोर्चाला प्रारंभ झाला. जि.प.शाळा, खुराणा पेट्रोलपंप, गांधी चौकमार्गे मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. हाती पिवळे झेंडे घेऊन नागरिक मोठ्या प्रमाणात या मोर्चात सहभागी झाले होते. जवळपास चार ते पाच हजारांपर्यंत संख्या होती. मोर्चेकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन शासनाकडे समाजाच्या भावना कळविण्याची विनंती केली. राज्यघटनेत ४६ व्या कलमानुसार महाराष्ट्रात एस.टी. प्रवर्गाच्या यादीत क्र.३६ वर धनगड ही जात आहे. मात्र धनगड व धनगर ही जात वेगळी असल्याचे कारण दाखवून आजपर्यंत आरक्षण नाकारण्यात आले आहे. त्यामुळे अन्याय होत असून पहिल्या मागासवर्ग आयोगानेच अनुसूचित जमातीच्या अंमलबजाणीची शिफारस केली होती, असे निवेदनात म्हटले.
यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर मोर्चेकऱ्यांनी ठिय्या मांडून प्रचंड घोषणाबाजी केली. आरक्षण देण्याची मागणी करणाऱ्या घोषणांचा यात समावेश होता.
निवेदन दिल्यानंतर मोर्चेकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. या मोर्चाचे नेतृत्व अ‍ॅड. माधवराव नाईक, रमेश नाईक, अशोकराव नाईक, केशवराव नाईक, अ‍ॅड.बाबा नाईक, शिवाजीराव मस्के, विनोद नाईक, पंढरी ढाले, दिनकर कोकरे, शशिकांत वडकुते आदींनी केले. मोर्चासाठी अ‍ॅड.राम नप्ते, डॉ.रमेश मस्के, विजय नाईक, भास्कर पोले, प्रा. गजानन गडदे, थोरात, सुभाष नाईक, डॉ.विलास खरात, रवी गडदे, शिवाजी मस्के, विकास शिंदे, अशोक करे, शिवाजी हाके, प्रल्हाद जहाने, बालासाहेब बारहाते, बाळासाहेब वायकोळे, विश्वनाथ गवारे, लखन शिंदे, प्रदीप नाईक, विनोद नाईक बालाजी डुकरे, श्याम हिंबरे आदींनी परिश्रम घेतले.
(जिल्हा प्रतिनिधी)
एकजुटीचे घडविले दर्शन
पक्षीय अभिनिवेश बाजूला सारून एकत्रितरीत्या या समाजाने आपल्या आरक्षणाची मागणी लावून धरल्याचे दिसून आले
पिवळ्या झेंड्यांमुळे मोर्चेकऱ्यांकडे लक्ष वेधल्या जात होते. त्याचबरोबर काहींनी फलकेही आणली होती.

Web Title: Dhangar community front

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.