शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

धनंजय मुंडे पांढरपेशी गुंड, मी परळीत त्यांच्याविरुद्ध लढणार; करुणा मुंडेंचा निर्धार 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 2, 2024 14:20 IST

स्वराज्य शक्ती सेनेच्या राष्ट्रीय अध्यक्षा करुणा मुंडे यांनी मराठवाड्यात ४७ जागा लढण्याचे जाहीर केले 

छत्रपती संभाजीनगर : धनंजय मुंडे हे पांढरपेशी गुंड असून मी त्यांच्याविरुद्ध परळी विधानसभा मतदारसंघात लढणार आहे, अशी माहिती मंगळवारी पत्रपरिषदेत स्वराज्य शक्ती सेनेच्या राष्ट्रीय अध्यक्षा करुणा मुंडे यांनी दिली.

पत्रपरिषद आटोपल्यानंतर त्या मराठा संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांना भेटण्यासाठी रवाना झाल्या. परळीत एवढी दहशत आहे की, तिथले पत्रकार पत्रपरिषदेलाही येत नाहीत. म्हणून मला छत्रपती संभाजीनगरात येऊन बोलावे लागत आहे, असे त्यांनी नमूद केले.

परळीत हाणामाऱ्या, खून, दडपशाही सुरू आहे. बायकोला घराबाहेर काढताहेत. शेतकरी व व्यापारी परळी सोडून गेले आहेत, असा आरोप त्यांनी केला. एकट्या परळीमधूनच नाही तर मी बीडमधूनही अर्ज भरणार असल्याचे सांगून त्या म्हणाल्या की, मागच्या तीन वर्षांपासून मी परळीत काम करून दाखवलंय. म्हणून मतदान मागते.

माझ्या जीवाला धोकाधनंजय मुंडे वंजारी समाजावरही अन्याय करीत आहेत. २००१ मध्ये त्यांनी तिथली गुंडगिरी मोडून काढली. आता तेच तिथे दडपशाही व गुंडगिरी करीत आहेत. माझ्या जिवाला धोका आहे. आठ महिन्यांपूर्वी मला मारहाण झाली होती. मागे मी ४५ दिवस तुरुंगात राहिली. तिथेच माझ्या मनात क्रांतीची ठिणगी पडली, असे त्या म्हणाल्या.

मराठवाड्यात ४७ जागा लढणारमुंडे आज सत्ताधीश आहेत. त्यांच्यासमोर आपला टिकाव कसा लागेल, यावर त्या उद्गारल्या, मी पण छोटी नाही. मुंडे घराण्याची सून आहे. मी लढेन व जिंकेनही. मराठवाड्यात ४७ व पुण्यात दहा जागा स्वराज्य शक्ती सेना लढवणार असल्याची घोषणाही त्यांनी केली.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादDhananjay Mundeधनंजय मुंडेBeedबीडvidhan sabhaविधानसभा