अण्णा भाऊ साठे अभ्यास केंद्रासाठी धरणे आंदोलन
By Admin | Updated: August 18, 2014 00:34 IST2014-08-18T00:08:58+5:302014-08-18T00:34:13+5:30
१६ आॅगस्टपासून विद्यापीठासमोर प्रदेशाध्यक्ष भीमराव सूर्यवंशी यांच्या नेतृत्वाखाली धरणे आंदोलन सुरू करण्यात आले आहे़

अण्णा भाऊ साठे अभ्यास केंद्रासाठी धरणे आंदोलन
नांदेड : पुरोगामी लोकशाहीवादी विद्यार्थी आंदोलनाच्या ( पी़ डी़ एस़ एफ़) वतीने स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठात अण्णा भाऊ साठे अध्यासन व अभ्यास केंद्र सुरू करण्यात यावे, या मागणीसाठी १६ आॅगस्टपासून विद्यापीठासमोर प्रदेशाध्यक्ष भीमराव सूर्यवंशी यांच्या नेतृत्वाखाली धरणे आंदोलन सुरू करण्यात आले आहे़
बहुजन नायक अण्णा भाऊ साठे यांनी आपल्या साहित्यातून उपेक्षित व कष्टकऱ्यांच्या वेदना जगा समोर मांडल्या़ अण्णा भाऊंच्या क्रांतीकारी कामगिरीची दखल रशियाने सुध्दा घेतली़ मात्र आजही महाराष्ट्र शासनाकडून अण्णा भाऊंची उपेक्षाच होत आहे़ सावित्रीबाई फुले, पुणे विद्यापीठ व डॉ़ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात अण्णा भाऊ साठे अध्यासन व अभ्यास केंद्र सुरू करण्यात आले आहेत़
परंतु स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे प्रशासन जाणीवपूर्वक अण्णा भाऊ साठे अध्यासन व अभ्यास केंद्र स्थापनेसाठी टाळाटाळ करीत असल्याचा आरोप संघटनेचे संस्थापक अध्यक्ष प्रा़ सदाशिव भुयारे यांनी केला आहे़ मागणी मान्य न झाल्यास आंदोलन तीव्र करण्याचा इशाराही त्यांनी दिला़
आंदोलनात सुरेश डोणगावकर, नागसेन कांबळे, माधव गोळेगावकर, संतोष बोकारे, संजय वाघमारे, प्रा़ चंद्रकांत ठाणेकर, प्रा़ यशपाल गवाले, किरण तुरेराव, गौतम कांबळे, चिराग घायाळे, भीमराव वाघमारे यांनी सहभाग घेतला़
(प्रतिनिधी)