दुष्काळासाठी धडकला मोर्चा
By Admin | Updated: August 12, 2014 02:00 IST2014-08-12T01:29:56+5:302014-08-12T02:00:26+5:30
परभणी : जिल्ह्यात दुष्काळ जाहीर करावा, या प्रमुख मागणीसह अन्य मागण्यांसाठी शिवसेनेने सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर बैलगाडी मोर्चा नेला.

दुष्काळासाठी धडकला मोर्चा
परभणी : जिल्ह्यात दुष्काळ जाहीर करावा, या प्रमुख मागणीसह अन्य मागण्यांसाठी शिवसेनेने सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर बैलगाडी मोर्चा नेला. या मोर्चात शेतकरी बैलगाड्यांसह मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
शनिवार बाजार येथून दुपारी १ च्या सुमारास खा.संजय जाधव यांच्या नेतृत्वाखाली निघालेला मोर्चा शिवाजी चौक, गांधी पार्क, अष्टभूजा देवी मंदिर, विसावा कॉर्नर मार्गे जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा धडकला. ७०० हून अधिक बैलगाड्यांसह शेतकरी मोर्चात सहभागी झाल्याचा दावा शिवसेनेने केला आहे. विविध मागण्यांचे फलक हातात घेऊन शेतकरी मोर्चात सहभागी झाले होते. हा मोर्चा श्री शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ आल्यानंतर खा. संजय जाधव, जिल्हाप्रमुख गंगाप्रसाद आणेराव, डॉ. शिवाजी दळणर, आ. मीराताई रेंगे आदींनी मार्गदर्शन केले. याप्रसंगी व्यासपीठावर डॉ. संजय कच्छवे, डॉ. राहुल पाटील यांची उपस्थिती होती.
या मोर्चात भागवत कदम, विलास जाधव, सुधाकर खराटे, कल्याणराव रेंगे, प्रा. पंढरीनाथ धोंडगे, माणिक पोंढे, दशरथ भोसले, अजित वरपूडकर, गंगाप्रसाद आणेराव, नंदू अवचार, काशीनाथ काळबांडे, बालासाहेब लोखंडे, विष्णू मुरकुटे, भारत पवार, रणजीत गरजमल, विष्णू मांडे, पंढरीनाथ घुले, संजय साडेगावकर, रंगनाथ रोडे, रवींद्र धर्मे, अर्जून सामाले, श्रीनिवास रेंगे, अनिल डहाळे, सुरेश ढगे, संजय सारणीकर, गंगाधर कदम, अतुल सरोदे, संदीप भंडारी, बाळासाहेब जाधव, बाळासाहेब राखे, धोंडीराम जाधव, रामकिशन शिंदे, अनिल सातपुते, दयानंद कुदमुळे, मनिष कदम, ज्ञानेश्वर पवार, बंटी कदम, महेश साळापुरकर, गजानन पवार, कांतराव धानोरकर, राजू कच्छवे, गजानन देशमुख, सदाशीवराव देशमुख आदींसह बहुसंख्य शिवसैनिक उपस्थित होते.
(प्रतिनिधी)