शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
6
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
7
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
8
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
9
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
10
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
11
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
12
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
13
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
14
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
15
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
16
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
17
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
18
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
19
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
20
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
Daily Top 2Weekly Top 5

धारूरात पाणी पेटले

By admin | Updated: August 5, 2015 00:36 IST

अनिल महाजन , धारूर दिवसेंदिवस पाणीटंचाई रौद्र रूप धारण करीत असल्याने पाणी जीवन नव्हे संघर्ष बनतोय. याचा प्रत्यय मंगळवारी धारूर तालुक्यात आला.

अनिल महाजन , धारूरदिवसेंदिवस पाणीटंचाई रौद्र रूप धारण करीत असल्याने पाणी जीवन नव्हे संघर्ष बनतोय. याचा प्रत्यय मंगळवारी धारूर तालुक्यात आला.तालुक्यातील मोरफळी साठवण तलावातून आठ टँकरने आजूबाजूच्या गावांना पाणीपुरवठा केला जात होता. आता अत्यल्प पाणीसाठा शिल्लक राहिल्याने मोरफळी साठवण तलावाजवळील आसरडोह येथील ग्रामस्थांनी हे पाणी भविष्यात आम्हाला लागेल, असा मुद्दा पुढे करीत होत असलेल्या आठ गावांचा पाणीपुरवठा दोन दिवसांपासून थांबवला आहे. मोरफळी साठवण तलावाजवळ सध्या आठ टँकर पाण्याच्या मागणीसाठी उभे ओहत.मोरफळी तलावावर पाण्यासाठी सुरू असलेला संघर्ष आता शिगेला पोहचण्याची शक्यता आहे. आसरडोह येथील ग्रामस्थांच्या मतांनुसार येथील पाणीसाठा आरक्षित आहे. भविष्यात आसरडोह गावाकरिता आरक्षित ठेवण्याचा निर्णय शासनाने घेतलेला आहे. यामुळे हे पाणी आम्ही इतर गावांना टँकरद्वारे नेऊ देणार नाही, अशी भूमिका आसरडोह येथील ग्रामस्थांनी घेतली आहे. टँकर चालक व आसरडोह येथील ग्रामस्थ यांच्यातील संघर्षाची प्रशासनाला कालपर्यंत कसलीच खबरदारी नव्हती. माहिती झाल्यानंतर गटविकास अधिकारी यांनी तलावाला भेट दिली. यामुळे प्रकरण निवळले आहे.या ठिकाणी होत होता पाणीपुरवठायेथील साठवण तलावावरून आठ टँकरद्वारे आसोला आईचा तांडा, चांभारतळ तांडा, अंजनडोह, उमरेवाडी, कोळपिंप्री, खोडस, वाघोली, चिंचपूर या गावांना पाणी पुरवठा केला जातो. तूर्तास तरी संबंधित गावांना पाणीपुरवठा सुरू आहे.गटविकास अधिकारी कांबळे यांनी मोरफळी साठवण तलावावर जाऊन परिस्थितीची पाहणी केली व आसरडोह येथील ग्रामस्थांना भेटून त्यांची समजूत घातल्याने तूर्तास तरी हा प्रश्न मिटला असून, सध्या टँकर पूर्ववत झाले आहेत.४धारूर तालुक्याप्रमाणेच इतर तालुक्यांमध्येही भविष्यात पाणी प्रश्न पेटू शकतो, अशी परिस्थिती निर्माण झाला आहे. याचा बंदोबस्त करण्यासाठी प्रशासनाला विशेष लक्ष देण्याची गरज असल्याचे नागरिकांनी सांगितले.