शाडूच्या गणेशमूर्तींना भक्तांची सर्वाधिक पसंती
By Admin | Updated: August 29, 2014 01:31 IST2014-08-29T01:07:39+5:302014-08-29T01:31:58+5:30
औरंगाबाद : गणेशोत्सवाचे स्वागत जोरदार केले जात असताना काळानुरूप त्याच्या स्वरूपात बदल झाले पाहिजेत, अशी समस्त गणेशभक्तांची केवळ मागणीच आहे असे नाही;

शाडूच्या गणेशमूर्तींना भक्तांची सर्वाधिक पसंती
औरंगाबाद : गणेशोत्सवाचे स्वागत जोरदार केले जात असताना काळानुरूप त्याच्या स्वरूपात बदल झाले पाहिजेत, अशी समस्त गणेशभक्तांची केवळ मागणीच आहे असे नाही; तर हे बदल कसे करता येतील हेही त्यांनी सांगितले आहे.
२९ आॅगस्टपासून सुरू होत असलेल्या ११ दिवसांच्या गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर ‘लोकमत’ने १७ ते ६५ वर्षे वयापर्यंतच्या ६५ स्त्री-पुरुषांना प्रश्नावली दिली होती.
शिक्षण, नोकरी, व्यवसाय, घरकाम, गृहिणी अशा वेगवेगळ्या जबाबदाऱ्या पार पाडणारे गणेशभक्त जागरूक नागरिक असल्याचे या पाहणीतून समोर आले आहे.
प्लास्टर आॅफ पॅरिसच्या मूर्ती पाण्यात विरघळत नसल्याने सर्वाधिक पसंती शाडूच्या गणेशमूर्तींना मिळाली आहे. गणेशोत्सवात आवाजाचा त्रास खूप होतो, अशी सार्वत्रिक तक्रार असली तरी या पाहणीत भक्तांनी मंडळाच्या ठिकाणी लाऊडस्पीकर असावा, अशी ठाम भूमिका घेतली आहे. ६५ पैकी ४१ जणांना लाऊडस्पीकर असावा असे वाटते. उत्सवाचे १० दिवस गणपतीच्या मूर्ती बघायला येणाऱ्या भक्तांना चित्रपटांतील गाणी ऐकायला काही प्रमाणात आवडते. मात्र, या उत्सवात चित्रपटगीते वाजवूच नयेत, असेही तेवढ्याच भक्तांना वाटते.
उत्सवाच्या शेवटच्या दिवशी विसर्जन मिरवणुकीचे आकर्षण सगळ्यांनाच असते. त्या दिवशी जवळपास सुटीही असते. त्यामुळे आबालवृद्धांमध्ये मिरवणुकीचा उत्साह असतो. विसर्जन मिरवणूक पुणे शहरात २४-३० तास चालते. औरंगाबादेतही ही मिरवणूक किती चालावी, हे सांगताना नागरिकांनी १२ तासांना सर्वाधिक पसंती दिली.
कार्यकर्त्यांनी धांगडधिंगा करू नये. त्यामुळे मंडळाची व उत्सवाची प्रतिमा मलिन होते.
४इतरांना त्रास होऊ नये अशा पद्धतीने उत्सव साजरा करावा.
४उत्सवाच्या मूळ धार्मिक परंपरा जपाव्यात.
४सांस्कृतिक कार्यक्रम करावेत.
४समाजोपयोगी उपक्रमांनाही प्राधान्य असावे.
४दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर अनुत्पादक खर्च कमी करून तो पैसा सरकारला द्यावा.