शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

घृष्णेश्वराच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी; हर हर महादेवाच्या जयघोषाने मंदीर परिसर दुमदुमला

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 5, 2024 19:51 IST

श्रावण महिन्याचा प्रारंभच सोमवारपासून सुरू झाल्याचा योगायोग ७७ वर्षानंतर आला आहे.

- सुनील घोडकेखुलताबाद: हिंदू धर्मियांचा पवित्र श्रावण मास आजपासून सुरू झाला असून  पहिल्याच श्रावणी सोमवारी वेरूळ येथील बारावे ज्योतिर्लिंग श्री घृष्णेश्वराच्या दर्शनासाठी पहाटेपासूनच भाविकांची मोठी गर्दी झाली होती. 

श्रावण महिन्याचा प्रारंभच सोमवारपासून सुरू झाल्याचा योगायोग ७७ वर्षानंतर आला आहे. वेरूळ येथील बारावे ज्योतिर्लिंग श्री घृष्णेश्वर मंदीरात दर्शनासाठी पहाटेपासूनच भाविकांची रिघ लागली होती.  पहाटे सहापासून चांगली गर्दी झाल्याने मंदीराच्या आतमधील दर्शनरांग फुल झाली होती. श्री घृष्णेश्वराच्या दर्शनासाठी पंचक्रोशीतील भाविकांना सकाळी ४ ते ६ दरम्यान सोडण्यात आले होते.  छत्रपती संभाजीनगरहून भाविकाच्या सोयीसाठी जादा सिटी बसेसची व्यवस्था करण्यात आली आहे. दिवसभर सिटीबसेसला मोठी गर्दी असल्याचे चित्र होते. भाविकांच्या सोयीसाठी देवस्थान ट्रस्टच्या वतीने सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यात आला होता. तर पोलीस प्रशासनाच्या वतीने तगडा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. 

दरम्यान, सकाळी ६ वाजेच्या दरम्यान विरोधीपक्ष नेते अंबादास दानवे यांनी कुटूंबियांसोबत दर्शन घेतले होते. देवस्थान ट्रस्ट च्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला होता. तहसीलदार स्वरूप कंकाळ, पोलीस निरीक्षक धनंजय फराटे यांची यावेळी उपस्थिती होती. वेरूळनगरी श्रावण महिन्याच्या पहिल्याच दिवशी भाविकांच्या गर्दीने दुमदमले होते. हर हर महादेव, श्री घृष्णेश्वर भगवान की जय म्हणत भाविक दर्शन घेत होते.  श्रावणी सोमवार निमित्त मंदीर परिसरात मोठ्या बेल व पानफुल व प्रसादाची विक्री झाली. मंदीर परिसराला आज यात्रेचे स्वरूप आले होते. अनेक भाविकांनी दर्शनानंतर जगप्रसिद्ध वेरूळ लेणीत जावून पर्यटनाचा आनंद घेतला.

टॅग्स :Shravan Specialश्रावण स्पेशलAurangabadऔरंगाबाद