गोरक्षनाथ टेकडीवर भक्तांची मांदियाळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 8, 2017 00:26 IST2017-08-08T00:26:55+5:302017-08-08T00:26:55+5:30

बीड तालुक्यातील बीड - परळी महामार्गावरील ढेकणमोहापासून हाकेच्या अंतरावरील गोरक्षनाथ टेकडीवर सोमवारी भक्तांची मांदियाळी होती

 Devotees on the Gorakhnath hill | गोरक्षनाथ टेकडीवर भक्तांची मांदियाळी

गोरक्षनाथ टेकडीवर भक्तांची मांदियाळी

बीड तालुक्यातील बीड - परळी महामार्गावरील ढेकणमोहापासून हाकेच्या अंतरावरील गोरक्षनाथ टेकडीवर सोमवारी भक्तांची मांदियाळी होती. या ठिकाणी २० व्या शतकातील थोर संत ह. भ. प. वै. गुरूवर्य किसन बाबा महाराज यांच्या १९ व्या पुण्यतिथी निमित्त सप्ताहाचे आयोजन केले होते. याची सांगता सोमवारी झाली. ह.भ.प.शांतीब्रम्ह श्री नवनाथ बाबा महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली हा हरीनाम सप्ताह पार पडला. यामध्ये रामायणाचार्य ह.भ.प.संजय महाराज पाचपोर (बुलडाणा) यांचे काल्याचे कीर्तन झाले. यावेळी भाजप जिल्हाध्यक्ष रमेश पोकळे, संदीप क्षीरसागर, योगेश क्षीरसागर, शिवाजी फड, गंगाधर घुमरे, ह.भ.प.अरूण डाके, आबा लाडे, चद्रंकात फड, ह.भ.प. नाना महाराज डाके, ह.भ.प. हरीदास महाराज जोगदंड, ह.भ.प. सुरेश महाराज जाधव, हरिष खाडे, ज्ञानेश्वर बांडे, भागवत खाकरे यांच्यासह पंचक्रोशीतील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. काल्याच्या कीर्तनानंतर टेकडीवर आलेल्या भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला.

Web Title:  Devotees on the Gorakhnath hill

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.