नाथषष्ठीसाठी पैठणमध्ये येणाऱ्या भाविकांची होणार कोरोना तपासणी; नगरपरिषदेने उभारली तीन केंद्रे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 1, 2021 07:32 PM2021-04-01T19:32:25+5:302021-04-01T19:36:38+5:30

नगर परिषदेच्यावतीने नाथमंदीर व यात्रा मैदान परिसर उद्यापासून सँनिटायिझ करण्यात येणार असल्याचे मुख्याधिकारी सोमनाथ जाधव यांनी सांगितले.

Devotees coming to Paithan for Nathashthi will have a corona check | नाथषष्ठीसाठी पैठणमध्ये येणाऱ्या भाविकांची होणार कोरोना तपासणी; नगरपरिषदेने उभारली तीन केंद्रे

नाथषष्ठीसाठी पैठणमध्ये येणाऱ्या भाविकांची होणार कोरोना तपासणी; नगरपरिषदेने उभारली तीन केंद्रे

googlenewsNext
ठळक मुद्देतीन कोरोना तपासणी केंद्र नगरपरिषदेच्यावतीने आज उभारण्यात आले आहेत

पैठण : नाथषष्ठी निमित्ताने  भाविक व वारकऱ्यांची गर्दी लक्षात घेता पैठण शहरात येणाऱ्या रस्त्यावर चेकपोस्ट व कोरोना तपासणी केंद्र प्रशासनाच्यावतीने उभारण्यात येणार आहे. शहरात येणाऱ्या भाविक व वारकऱ्यांची या ठिकाणी तपासणी करण्यात येणार असून लक्षणे असल्यास अँटिजेन चाचणी करण्यात येईल असे मुख्याधिकारी सोमनाथ जाधव यांनी सांगितले.

नाथषष्ठी यात्रा रद्द करण्यात आली असली तरी दर्शनासाठी मोठ्या संख्येने वारकरी व भाविक पैठण शहरात दाखल होण्याची शक्यता नाकारता येत नसल्याने प्रशासन सतर्क झाले असल्याचे दिसून येत आहे.पैठण शहरात येणाऱ्या  पैठण-शेवगाव रोडवर गोलनाका परिसर, पैठण-औरंगाबाद रस्त्यावर हॉटेल सह्याद्रीजवळ व शहरातील गागाभट्ट चौकात असे तीन कोरोना तपासणी केंद्र नगर परिषदेच्यावतीने आज उभारण्यात आले. या ठिकाणी पैठण शहरात येणाऱ्या भाविकांची व वारकऱ्यांची थर्मल गनद्वारे तापमान तपासून शरीरातील ऑक्सिजन लेव्हल सुध्दा घेण्यात येणार आहे. यात लक्षणे आढळून आलेल्या भाविकांची अँटिजेन चाचणी करण्यात येणार आहे. नगर परिषदेच्यावतीने नाथमंदीर व यात्रा मैदान परिसर उद्यापासून सँनिटायिझ करण्यात येणार असल्याचे मुख्याधिकारी सोमनाथ जाधव यांनी सांगितले. दरम्यान आज नाथमंदीर परिसर, गोदाकाठातील निर्याण दिंडी मार्ग, गागाभट्ट परिसर, पालखी ओटा, व आतील नाथ मंदीर परिसराची स्वच्छता नगरपरिषदेच्यावतीने करण्यात आली.

पोलिसांचे पथसंचलन.....
आज उपविभागीय पोलीस अधिकारी गोरख भामरे, पोलीस निरीक्षक किशोर पवार, प्रभारी तहसीलदार दत्तात्रय निलावाड, व मुख्याधिकारी सोमनाथ जाधव यांच्या उपस्थितीत आज पोलीस दलाचे शहरातून संचलन करण्यात आले.

तगडा पोलीस बंदोबस्त.....
नाथषष्ठी यात्रा रद्द करण्यात आली असली तरी भाविक व वारकरी दर्शनासाठी येणार हे गृहीत धरून कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी तगडा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असल्याचे पोलीस निरीक्षक किशोर पवार यांनी सांगितले. २० वरीष्ठ पोलीस अधिकारी, आरसीपी पथक, व जवळपास ३०० कर्मचाऱ्यांचा बंदोबस्त विविध ठिकाणी नियुक्त करण्यात आला आहे. 

दोन चेक पोस्ट...
पैठण व अहमदनगर जिल्हा हद्दीवर बलदवा फार्म हाऊसजवळ व पैठण औरंगाबाद रस्त्यावर सह्याद्री चौकात असे दोन ठिकाणी चेकपोस्ट उभारण्यात येणार असल्याचे पोलीस निरीक्षक किशोर पवार यांनी सांगितले.

वारकरी भाविकांचे आजपासून आगमन.....
नाथषष्ठी साठी मोठ्या संख्येने वारकरी असलेल्या दिंड्या पैठण शहरात येतात मात्र आज चार ते पाच वारकरी मिळून दिंडी घेऊन येत असल्याचे दिसून आले. दरम्यान गुरुवारी सायंकाळपासून थोड्याफार प्रमाणात वारकऱ्यांचे आगमन पैठण शहराछ सुरू झाले होते.

Web Title: Devotees coming to Paithan for Nathashthi will have a corona check

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.