कोरोनामुक्तीसाठी भाविक शनी देवाच्या चरणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2021 04:04 IST2021-06-11T04:04:57+5:302021-06-11T04:04:57+5:30
औरंगाबाद : संपूर्ण जगाला कोरोनामुक्त कर, असे साकडे घालत गुरुवारी भाविकांनी शनी देवाच्या चरणी प्रार्थना केली. निमित्त होते, शनी ...

कोरोनामुक्तीसाठी भाविक शनी देवाच्या चरणी
औरंगाबाद : संपूर्ण जगाला कोरोनामुक्त कर, असे साकडे घालत गुरुवारी भाविकांनी शनी देवाच्या चरणी प्रार्थना केली.
निमित्त होते, शनी जयंतीचे. शहरातील शनी मंदिर काही वेळेसाठी उघडण्यात आले होते. शहरातील सर्वांत जुने शनी मंदिर कोटला कॉलनीत आहे. मंदिराचा गाभारा रंगीत फुलांनी सजविण्यात आला होता. भविकांनी सकाळी दर्शनासाठी गर्दी केली होती. परिसरात फूल, काळी बाहुली, कोहळे विक्रेत्यांनी बस्तान मांडले होते. मंदिरात दुपारी भंडारा आयोजित केला होता. पंगतीवर पंगती सुरू होत्या. सायंकाळी मंदिरात आरती करण्यात आली.
सिडको
सिडको एन २ येथील ठाकरे नगरातील शनी मंदिरात शनी देवाच्या मूर्तीस अभिषेक करण्यात आला. यावेळी देवाच्या मूर्तीस आकर्षक सजविले होते. सायंकाळी सात वाजता शनीसाधिका विभाश्री दीदी यांनी महाआरती केली. थोड्या वेळासाठी मंदिर भाविकांसाठी उघडण्यात आले होते.
चिकलठाणा
चिकलठाणा येथील शनी आश्रमात शनी महाराज जन्मोत्सव साजरा करण्यात आला. सकाळी १० वाजता शनी देवाचा मूर्तीवर सामूहिक तेलअभिषेक करण्यात आला. यावेळी शनीसाधिका विभाश्री दीदी यांनी मंत्रोउच्चार केले. संपूर्ण जग कोरोनामुक्त होऊ दे, असे साकडे यावेळी देवाकडे घालण्यात आले.