राळेगण सिद्धी, हिवरेबाजारच्या धर्तीवर देवगावची वाटचाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2017 00:50 IST2017-09-13T00:50:09+5:302017-09-13T00:50:09+5:30

हिवरेबाजार, राळेगणसिद्धीच्या धर्तीवर आता वडवणी तालुक्यातील देवगावची वाटचाल सुरू आहे

Devgav is on the way to Ralegan Siddhi, Hivre Bazar | राळेगण सिद्धी, हिवरेबाजारच्या धर्तीवर देवगावची वाटचाल

राळेगण सिद्धी, हिवरेबाजारच्या धर्तीवर देवगावची वाटचाल

लोकमत न्यूज नेटवर्क
बीड/वडवणी : हिवरेबाजार, राळेगणसिद्धीच्या धर्तीवर आता वडवणी तालुक्यातील देवगावची वाटचाल सुरू आहे. जिल्ह्यात आदर्श गाव असणाºया देवगावच्या १०५ महिलांनी तीन दिवस विविध ठिकाणी भेट देऊन गावच्या विकासासाठी अभ्यास केला आहे. चुल आणि मुल या चौकटीत अडकेल्या महिला पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या प्रमाणात घराबाहेर पडल्या आहेत. कोणी न ओळखणाºया देवगावची ओळख महिला कारभारणींनी राज्याच्या कानाकोपºयात नेऊन पोहोचवली आहे.
वडवणी तालुक्यातील परंतु माजलगावमध्ये आर्थिक व्यवहार करणाºया देवगावची लोकसंख्या १३०० आहे. २५२ उंबरठ्याच्या गावात सध्या विविध आदर्श उपक्रम हाती घेतले जात आहेत. एरव्ही चुल आणि मुल व संसारात अडकून पडलेल्या महिलांना येथील सरपंच कैवल्याबाई रघुनाथ सुरवसे व उपसरपंच राधा जनार्दन सुरवसे यांनी त्यांना चौकटीतून बाहेर काढत विविध आदर्श गावांच्या अभ्यास दौºयासाठी नेले. तीन दिवस चाललेल्या या दौºयात महिलांनी आदर्श गावांचा अभ्यास करून तो ‘पॅटर्न’ गावात राबविण्याचा संकल्प केला असून त्याची अंमलबजावणीही सुरू केली आहे.दरम्यान, आदर्श गाव असलेल्या हिवरेबाजार येथे महिलांनी प्रथम भेट दिली. येथे पूर्ण गावांची पाहणी केली. ग्रामपंचायतचा कारभार कसा चालतो, डोंगरावरील पाणलोटची कामांची पाहणी करून अभ्यास केला. पोपटराव पवार यांनी महिलांना मार्गदर्शन केले. त्यानंतर ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांच्या राळेगणसिद्धीला भेट दिली. येथेही महिलांनी पूर्ण गाव फिरून हजारे यांच्याशी चर्चा केली त्यांनी महिलांच्या धाडसाचे आणि गावात केलेल्या कामांचे कौतूक केले. त्यांना गाव आदर्श बनविण्यासाठी काही टिप्सही दिल्या.

Web Title: Devgav is on the way to Ralegan Siddhi, Hivre Bazar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.