वैजापूर तालुक्यात कोट्यवधींची विकासकामे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2021 04:04 IST2021-04-30T04:04:32+5:302021-04-30T04:04:32+5:30
वैजापूर : कोरोनाच्या काळात नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेत असताना विकासाचा समतोल राखणेही गरजेचे आहे. त्यामुळे वैजापूर शहरासह ग्रामीण भागात ...

वैजापूर तालुक्यात कोट्यवधींची विकासकामे
वैजापूर : कोरोनाच्या काळात नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेत असताना विकासाचा समतोल राखणेही गरजेचे आहे. त्यामुळे वैजापूर शहरासह ग्रामीण भागात राज्य सरकारच्या विविध विभागांतर्गत मंजूर निधीतून कोट्यवधी रुपयांची विकास कामे सुरू असल्याची माहिती आ. रमेश बोरनारे यांनी बुधवारी संवाद मेळाव्यात दिली.
तालुक्यातील कोरोनाची सद्य:स्थिती व विकासकामे यावर आमदार संपर्क कार्यालयात २९ एप्रिल रोजी आयोजित संवाद मेळाव्यात आ. बोरनारे बोलत होते. यावेळी उपनगराध्यक्ष साबेरखान अमजदखान, शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख बाबासाहेब जगताप, मनाजी मिसाळ, तालुकाप्रमुख सचिन वाणी, नगरसेवक राजेंद्र साळुंके यांनीही संवाद साधला. बोरनारे म्हणाले, वैजापूर शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय रस्त्यांच्या कामालाही गती देण्यात आली आहे. राज्य सरकारने वैजापूर पोलीस ठाण्यासाठी ६९ रहिवासी संकुलांना व उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयाला मंजुरी दिली आहे. याशिवाय तहसील कार्यालयाच्या प्रशासकीय इमारतीलाही निधी मंजूर झाला आहे. त्यामुळे कोरोनाचा प्रभाव कमी झाल्यानंतर पायाभूत कामांनाही वेग येणार आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने तालुक्यात थैमान घातले असून सरकारी कोविड सेंटर व निवासी शाळेत रुग्णसंख्या क्षमतेएवढी आहे. त्यांना ऑक्सिजन पुरवठा, बेड यासह अन्य वैद्यकीय मदत देण्यास प्राधान्य देण्यात येत आहे. आमदार निधीतून पाच रुग्णवाहिकांसाठी प्रशासकीय मान्यता मिळाल्याने प्राथमिक आरोग्य केंद्रांना त्याचा फायदा मिळणार आहे. वैजापूर शहरात नगरपालिकेच्या हद्दीत २४ ठिकाणी ६ कोटी ६५ लाख रुपये खर्चाची कामे प्रगतिपथावर असल्याचे त्यांनी सांगितले. याशिवाय पुरणगाव, डोणगाव, शिऊर, जिरी यासह ग्रामीण भागातील अनेक रस्त्यांच्या दुरुस्तीचे काम घेतले आहे. शिऊर ते दौलताबाद या ५३ कि.मी. लांबीच्या रस्त्याचे मजबुतीकरण करण्यासाठी केंद्रीय परिवहनमंत्री नितीन गडकरी यांनी ५३ कोटी रुपयांना मंजुरी दिली आहे.
चौकट
शहराच्या तिन्ही बाजूस प्रवेशद्वार उभारणार
वैशिष्ट्यपूर्ण योजनेंतर्गत नगरपालिकेला मिळालेल्या अनुदानातून शहराच्या तिन्ही बाजूस प्रवेशद्वार, बाजारतळ येथे नाट्यगृह, मुरारी पार्क, गीताईनगर खुल्या जागेवर संरक्षण भिंत व सुशोभीकरणाचे काम होणार आहे. त्याचप्रमाणे तहसील कार्यालयाची नवीन प्रशासकीय इमारत, पोलिसांसाठी रहिवासी संकुल, जिल्हा परिषद शाळेच्या मैदानावर पाच कोटी रुपये खर्चून क्रीडांगण ही कामे प्रामुख्याने केली जाणार असल्याचे बोरनारे यांनी सांगितले.
फोटो : संवाद मेळाव्यात मार्गदर्शन करताना आ. रमेश बोरनारे व उपस्थित मान्यवर.
290421\1619624343-picsay_1.jpg
संवाद मेळाव्यात मार्गदर्शन करताना आ. रमेश बोरनारे व उपस्थित मान्यवर.