पर्यटनस्थळाचा विकास रखडला
By Admin | Updated: August 26, 2014 00:05 IST2014-08-26T00:05:18+5:302014-08-26T00:05:18+5:30
माहोरा : जाफराबाद तालुक्यातील मौजे संगमपूर येथील संगमेश्वर महादेवाच्या मंदिराला पर्यटनस्थळाचा दर्जा मिळून अनेक वर्ष झाली.

पर्यटनस्थळाचा विकास रखडला
माहोरा : जाफराबाद तालुक्यातील मौजे संगमपूर येथील संगमेश्वर महादेवाच्या मंदिराला पर्यटनस्थळाचा दर्जा मिळून अनेक वर्ष झाली. परंतु अद्यापही मंदिराचा म्हणावा तसा विकास झाला नाही. त्यामुळे पर्यटनस्थळाचे रखडलेले काम करण्याची मागणी ग्रामस्थानच्या वतीने करण्यात आली आहे.
हिवराईने नटलेल्या या परिसरात संगमेश्वर महादेवाचे अत्यंत पवित्र मंदिर आहे. शासनाने या मंदिराला तिर्थक्षेत्राचा दर्जा दिला आहे. परंतु मंदिर परिसर विकासाकडे कायम दुर्लक्ष झाल्याने नागरिकांमधून नाराजी व्यक्त होत आहे. पर्यटनाचाा दर्जा मिळाल्यानंतर पाहिजे तशी कामे अद्याप झालीच नाहीत. या परिसरात अद्यापही सुविधांचा अभाव आहे. नदीच्या काठी संगमेश्वर मंदिर असल्याने श्रावण महिन्यात चारही सोमवारी भाविकांची दर्शनासाठी मोठी गर्दी असते. अनेक वर्षापासून भाविकांनी मंदिराच्या रस्ता पक्का करून देण्याची मागणी पूर्ण झाली नाही.
शासनाने तात्काळ डांबरीकरणाचा रस्ता तयार करून द्यावा आणि मंदिर जीर्णोद्धाराचे सुरू असलेले काम लवकर पूर्ण करण्याची मगणी परिसरातील ग्रामस्थांनी केली आहे.
भाविकांसाठी पिण्याचे पाणी, रस्ता, विद्युत दिवे, स्वच्छता इत्यादी सुविधा देण्यात याव्यात. परिसराचे सुशोभिकरण करण्यात यावे, अशी मागणी भाविकांमधून होत आहे. (वार्ताहर)